10th Grade Student Ends Life at Private School Hostel Saam tv
देश विदेश

वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेतली; दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं, CCTVवरून तपास सुरू

10th Grade Student Ends Life at Private School Hostel: वसतिगृहात 10वीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं. उडी मारून आत्महत्या केली. सीसीटीव्हीतून पोलिसांचा तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं.

  • वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारली.

  • कुटुंबियांना वेगळाच संशय.

हिमाचल प्रदेशातील शिमलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहावीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात आत्महत्या केली. तिला गंभीर अवस्थेत कोटखाई रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह आयजीएमसी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली असून, पुढील तपास सुरू आहे.

रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वसतिगृहाच्या छतावरून विद्यार्थिनीनं उडी मारली. ती हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कोटखाईमधील एका खासगी शाळेत विद्यार्थिनीने दहावीच्या वर्गात शिकत होती. तिचा भाऊही त्याच शाळेत शिकत असल्याची माहिती आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलीस अधीक्षक संजीव जाधव म्हणाले की, 'विद्यार्थिनीच्या मृतदेहाचे आज शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. वसतिगृह तसेच शाळेतील प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाईल. पुढील तपास सुरू आहे', असं ते म्हणाले.

दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबाने शाळा आणि वसतिगृह व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. मृत मुलीच्या मामाने सांगितले की, 'रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्हाला शाळेकडून फोन आला होता. शाळेनं आम्हाला कळवले की, मुलीनं वसतिगृहाच्या छतावरून उडी मारली. आम्ही तिला रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्हीवरून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज चौथ्या मजल्यावरील आहे. पण मुलीनं पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनावर आम्हाला संशय आहे', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT