'१० मिनिटांत तयार हो, तुझ्यासोबत शरीरसंबंध..' CMOकडून महिला डॉक्टरवर जबरदस्ती, शेवटी हार्ट अटॅकनं मृत्यू

Civil Surgeon Manjit Singh Dies: सिव्हिल सर्जन डॉक्टर मनजीत सिंह यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. महिला डॉक्टरवर लैंगिक छळाचा आरोप.
Civil Surgeon Manjit Singh Dies
Civil Surgeon Manjit Singh DiesSaam
Published On
Summary
  • CMO डॉ. मनजीत सिंह यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू.

  • महिला डॉक्टरचा लैंगिक छळ.

  • आरोपीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू.

यमुनानगर येथील सिव्हिल सर्जन डॉ. मनजीत सिंह (वय वर्ष ५५) यांचा आज मृत्यू झाला आहे. महिला डॉक्टरच्या लैंगिक शोषण आणि जातीवाचक शब्दप्रयोग प्रकरणात ते फरार होते. सतत ठिकाणे बदलत ते पोलिसांच्या अटकेपासून बचाव करत होते. मात्र, आज कुरूक्षेत्र येथील एका फार्महाऊसवर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. पहाटे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

यमुनानगरमधील एका २५ वर्षीय महिला डॉक्टरने सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरने म्हटलं की, सीएमओ डॉ. सिंह अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असायचे. त्यामुळे महिलेला ऑफिसमध्ये जाण्यास भीती वाटात असे. सीएमओ विनाकरण महिलेला ऑफिसमध्ये बोलावत असे. यामुळे महिला अस्वस्थ व्हायची.

Civil Surgeon Manjit Singh Dies
आधी बायकोला संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; मित्राला VIDEO पाठवत म्हणाला.. इंजिनिअर कपलचा दुर्देवी अंत

महिलेनं तक्रारीत म्हटलं की, '२० सप्टेंबर रोजी सीएमओनं फोन केला होता. यावेळी त्यांनी शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच जातीबद्दलही अपमानास्पद टिप्पणी केली. १० मिनिटात तयार हो, मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे, असं ते म्हणाले. तुमच्यासारख्या लोकांना जॉब सहज मिळतात. ती टिकावण्यासाठी तुला यावंच लागेल'. असं सीएमओ म्हणाले, अशी माहिती पीडितेनं दिली.

Civil Surgeon Manjit Singh Dies
'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

महिला डॉक्टरने संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला. २२ सप्टेंबर रोजी पीडितेनं यमुनानगर येथील महिला पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. जिल्हा न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ते अत्यंत अश्लील असल्याचं म्हटलं आहे. तसेच आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी तपास केला. तसेच आरोपीचा शोध घेतला. सीएमओच्या कुटुंबाने पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले जात होते. याबाबतही महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, यानंतर सिंह यांच्या मृत्यूचीच बातमी समोर आली. त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com