Himachal Pradesh Rain, Latest Rain Updates Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh Rain: मणिकर्णमध्ये ढगफुटी, ४ लोक बेपत्ता; पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट

कुल्लूच्या मणिकरण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून, पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साम वृत्तसंथा

शिमला: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) बुधवारी मान्सूनने उग्र स्वरूप धारण केले. रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे, पुरामुळे कॅम्पिंगची जागा वाहून गेली असून चार लोक बेपत्ता आहेत.

कुल्लूच्या मणिकरण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून, पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच घरेही पाण्याखाली गेली असून, पुलाला तडे गेले आहेत. (Himachal Pradesh Rain Update)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. बुधवार रात्रीपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत सुरु. मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील हवामान विभागाने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बुधवारपासून तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने लोकांना नदीजवळ जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्याच्या (Rain) पहिल्या आठवड्यात हिमाचलमध्ये ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. आतापर्यंत १ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. (Live Rain Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long & Thick Hair Care Tips: केस लांब आणि दाट होण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

New Marathi Serial : प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येतेय नवीन मालिका; प्रोमोनं वेधलं लक्ष, मुख्य अभिनेत्री कोण? शोचे नाव आहे खूपच खास-VIDEO

Skin Care : बाहेर फंक्शनसाठी जाताय आणि इंस्टंट ग्लोइंग स्किन हवीये? मग वापरा 'हा' मिल्क पॉलिश मास्क

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

SCROLL FOR NEXT