Himchal Pradesh News Saamtv
देश विदेश

Himachal Pradesh Politics: बंडखोरांना काँग्रेसचा धक्का! व्हिप डावलून मतदान केल्याने ६ आमदार अपात्र

Congress Mla Disqualified: पक्षाचा व्हिप डावलून क्रॉस मतदान करणाऱ्या ६ काँग्रेस आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली असून या सर्वांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Himachal Pradesh Political Crisis:

हिमाचलच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचा व्हिप डावलून क्रॉस मतदान करणाऱ्या ६ काँग्रेस आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली असून या सर्वांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं?

हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या सर्व 6 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत 6 सन्माननीय आमदारांविरुद्धची तक्रार आमदार आणि मंत्री हर्षवर्धन जी यांच्यामार्फत आमच्या सचिवालयाला प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू ऐकून हा मोठा निर्णय दिला आहे.

सभापती कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, 'आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली, पण पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केले. आणि उमेदवाराच्या बाजूने मतदान केले नाही. मी सर्व बाजू ऐकल्या. माझ्या ऑर्डरची तीस पाने आहेत. मी प्रकरण पूर्णपणे ऐकले. मी दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्या आणि मग माझा निर्णय दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल अशी अपात्र ठरलेल्या आमदारांची नावे आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. ती जिंकण्यासाठी 35 आमदारांची मतांची गरज होती. काँग्रेसकडे 40 आमदार आहेत, त्यामुळे पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.

भाजपचे येथे 25 आमदार आहेत. त्यांना 10 मते कमी पडली, तरीही पक्षाने हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली. निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. तीन अपक्ष आमदारांनीही भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. अखेर चिठ्ठ्याद्वारे निर्णय झाला, त्यात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT