Lok Sabha Survey: भाजप 370 चा आकडा गाठणार? काँग्रेसला किती मिळू शकते जागा; नवीन सर्वेक्षणात समोर आली माहिती

Lok Sabha Survey 2024: आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देशातील वातावरण शिगेला पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका जाहीर होऊ शकतात. या निवडणुकीच्या वातावरणात एक नवीन सर्व्हे समोर आला आहे.
Rahul Gandhi Vs Narendra Modi
Rahul Gandhi Vs Narendra ModiSaam Tv
Published On

Lok Sabha Survey 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देशातील वातावरण शिगेला पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका जाहीर होऊ शकतात. यातच सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. या निवडणुकीच्या वातावरणात एक नवीन सर्व्हे समोर आला आहे.

Zee News-MATRIZE poll ने ओपिनियन पोल प्रसिद्ध केलं असून यावेळी कोणाचे सरकार येऊ शकते, याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए बंपर जागा जिंकू शकते. तर इंडिया आघाडीला धक्का बसू शकतो, असं सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Gandhi Vs Narendra Modi
Jharkhand Train Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडलं; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

या सर्वेक्षणानुसार, एनडीएला 377 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 94 आणि इतरांना 72 जागा मिळू शकतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 351 जागा जिंकल्या होत्या. तर यूपीएला लोकसभेच्या फक्त 90 जागा जिंकतंय आल्या होत्या. (Latest Marathi News)

Zee News-MATRIZE ने 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान लोकसभेचे जनमत सर्वेक्षण केले. यामध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1,67,843 व्यक्तींची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 87,000 पुरुष आणि 54,000 महिलांचा समावेश होता. याव्यतिरिक्त सर्वेक्षणात 27,000 अशा लोकांचा समावेश होता जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

Rahul Gandhi Vs Narendra Modi
Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, उद्या हजर राहण्याचे निर्देश; काय आहे प्रकरण?

उत्तरेत एनडीएचे वर्चस्व, दक्षिणेत विरोधी आघाडी

Zee News-MATRIZE poll नुसार, आज निवडणुका झाल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठं बहुमत मिळू शकतं. उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील महत्त्वाच्या भागात एनडीएचाला अधिक जागा मिळू शकतात, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. यातच सर्वेक्षणाच्या निकालानुसार, दक्षिणेकडील राज्यांमध्ये विरोधी पक्षांना अधिक जागा मिळू शकते, असं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com