Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, उद्या हजर राहण्याचे निर्देश; काय आहे प्रकरण?

Cbi Summons To Akhilesh Yadav: बेकायदेशीर खाण प्रकरणी सीबीआयने सपा प्रमुख अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. अखिलेश यांना उद्या म्हणजेच २९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
Cbi Summons To Akhilesh Yadav
Cbi Summons To Akhilesh YadavSaam Tv
Published On

CBI Summons To Akhilesh Yadav:

बेकायदेशीर खाण प्रकरणी सीबीआयने सपा प्रमुख अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. अखिलेश यांना उद्या म्हणजेच २९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात अखिलेश यांना साक्षीदार म्हणून हजर राहावे लागणार आहे.

अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हा प्रकार घडला होता. त्यावेळी अखिलेश यादव यांच्याकडे खाण मंत्रीपदाची जबाबदारीही होती. त्यावेळी बंदी असतानाही खाणकामाचे कंत्राट देण्यात आले होते, असा आरोप आहे. २०१६ पासून खाण घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cbi Summons To Akhilesh Yadav
CM Fake Signature: धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच अखिलेश यादव यांना सीबीआयने कोणत्याही प्रकरणात समन्स बजावले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या समन्सकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

याआधीही अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केले आहेत. सपाच्या एका नेत्यानेही अखिलेश यांच्या समन्सबद्दल बोलताना हे राजकीय हेतूने केले जात असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी सीबीआय आणि ईडी अशा पद्धतीने सक्रिय होतात.

Cbi Summons To Akhilesh Yadav
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल

अखिलेश सरकारमध्ये खाण मंत्री राहिलेल्या गायत्री प्रजापती यांच्यावरही अनेक प्रकारचे आरोप झाले होते. ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांना निवडणूक लढवता आली नसल्याने सपाने त्यांच्या पत्नीला तिकीट दिले आणि त्या आमदार म्हणून निवडूनही आल्या. दरम्यान, सोमवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीही त्या गैरहजर होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com