10th Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात

Maharashtra SSC Board Exam 2024: राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत आहे. यंदा १६ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
10th Exam
10th ExamSaam Tv
Published On

10th Exam Starts From Tomorrow

पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली आहे. राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत (Maharashtra SSC Exam) आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा (10th Exam) आहे. कारण उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. आज माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या दहावीचा पहिला पेपर

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार (Maharashtra SSC Exam 2024) आहे. उद्या दहावीचा पहिला पेपर आहे. दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण वळण असते. दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट व्हायला लागतात.

परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू (10th Exam Starts From Tomorrow) नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.

10th Exam
UP Police Exam Cancelled: उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परीक्षा करण्यात आली रद्द

भरारी पथकाची नेमणूक

विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा विचार करु नका. कारण गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कुणी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई (SSC Board Exam 2024) केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

यावर्षी १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत.परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली (10th Exam Starts From Tomorrow) आहे. परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

10th Exam
TCS IBPS Exams : वादग्रस्त टीसीएस आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा नको; प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com