Himachal Pradesh Political Crises Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh Political Crises : 'लढत राहू...', राजीनाम्याच्या अफवेनंतर मुख्यमंत्री सुक्खू यांची पहिली प्रतिक्रिया

Political News : सध्या भाजपचा सरकार पाडण्याचा कोणताही हेतू नाही. सूत्रांच्या मते हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यास भाजप आपली चाल खेळू शकतो.

प्रविण वाकचौरे

Himachal Pradesh Politics :

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी  काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने सुखविंदर सिंह सुक्खू यांचं सरकार धोक्यात आलं आहे. यातच सुखविंदर सिंग सुक्खू यांनी राजीना दिल्याची बातमा समोर आली होती. मात्र या सर्व अफवा असल्याची स्वत: मुख्यमंत्री सुक्खू यांनी समोर येत स्पष्ट केलं आहे.

सुखविंदर सिंह सुक्खू यांनी म्हटलं की, मी राजीनामा दिलेला नाही. आम्ही लढत राहू. माझ्या राजीनाम्याची अफवा आहे. आमचं सरकार स्थिर आहे. आमच्याकडे बहुमत आहे आणि सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. याउलट मुख्यमंत्री सुक्खू यांनी दावा केलाय की, भाजपचे देखील आमदार आमच्या संपर्कात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांच्या माहितीनसार, भाजप हायकमांड हिमाचल प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या भाजपचा सरकार पाडण्याचा कोणताही हेतू नाही. सूत्रांच्या मते हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यास भाजप आपली चाल खेळू शकतो.  (Latest News)

भाजपच्या १५ आमदारांचं निलंबन

हिमाचलमध्ये राजकीय स्थितीदरम्यान विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. जयराम ठाकूर, विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलवीर शर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूर्ण चंद्र, इंदर सिंग गांधी, दलीप ठाकूर आणि रणवीर सिंग या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री बदलण्याची मागणी

मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा देण्याची मागणी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी केली आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा, असं आवाहन काँग्रेस नेते विक्रमादित्य यांनी हायकमांडला केलं आहे. काल राज्यसभा मतदानावेळी झालेल्या क्रॉस व्होटिंगसाठी देखील मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता काँगेस नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांच याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

SCROLL FOR NEXT