Himachal Pradesh Factory Fire Saamtv
देश विदेश

Himachal Pradesh Fire: परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग; १५- २० कामगार अडकले, बचावकार्य सुरू| VIDEO

Himachal Pradesh Factory Fire: हिमाचल प्रदेशातील सोलन औद्योगिक क्षेत्र बड्डी येथील झारमजरी येथे असलेल्या कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. कारखान्यात 50 मजूर काम करत होते

Gangappa Pujari

Himachal Pradesh Fire:

हिमाचलप्रदेशमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. हिमाचलप्रदेशच्या सोलन जिल्ह्यात एका कॉस्मेटिक फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३० कामगार जखमी झाले असून अद्याप २० कामगार अडकल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिमाचल प्रदेशातील सोलन औद्योगिक क्षेत्र बड्डी येथील झारमजरी येथे असलेल्या कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. कारखान्यात 50 मजूर काम करत होते. यामधील 30 जणांना बाहेर काढण्यात आले.

अग्निशमन विभागाच्या बड्डी आणि नालागडच्या अर्धा डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य अजूनही सुरू आहे. प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. डीसी सोलन मनमोहन शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, या आग लागल्यानंतर काही मजुरांनी उडी टाकण्याचाही प्रयत्न केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती १५- २० जण फॅक्टरीत अडकले असल्याचे सांगताना दिसत आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

SCROLL FOR NEXT