Weather Update Today: काश्मीरपासून, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी, महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार

Weather Update: काश्मीरपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये दाट धुक्याची स्थिती आहे. राज्यातील वातावरण आज कसं असेल, ते आपण जाणून घेऊ या.
Weather Update
Weather Update Saam Tv
Published On

Weather Fog Cold Update

उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबमध्ये आज दाट धुके आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये आज तीव्र थंडी राहण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआरमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. इतर राज्यांतील वातावरण (Weather Update) कसं असेल ते सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

थंडीचा कडाका वाढणार

आज महाराष्ट्र राज्यात पुणे शहरासह जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी शहरात पुन्हा थंडीचा पारा घसरला आहे. पुढील एक आठवडा जिल्ह्यात थंडी जास्त असणार आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत राज्यात तीव्र थंडी असेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. आता (Weather Update Maharashtra) थंडी कमी जाणवत असली तरीही आठवड्याच्या शेवटी थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे. शनिवारपर्यंत थंडीचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. धुळे शहरात देखील थंडीचा कडाखा कायम आहे. शहरात आज आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून दहा अंशपेक्षा कमी तापमानाची धुळ्यात नोंद केली जात आहे. धुळेकर या वाढत्या थंडीमुळे चांगलेच गारठले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ठिकाणी दाट धुके

जम्मू-काश्मीर, लडाख ते हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाब व्यतिरिक्त राजस्थानच्या मोठ्या भागात दाट धुकं असणार आहे. आज सकाळी दिल्लीत नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

तीव्र थंडीची परिस्थिती

काही राज्यांमध्ये आज बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटांव्यतिरिक्त तामिळनाडू, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता (Delhi Weather) आहे. हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पुढील तीन दिवस जास्त थंडी राहण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीला पश्चिम हिमालयीन भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका पाऊस झाला आहे.

Weather Update
Cold Wave : शेकोटी करून द्राक्षबाग वाचवण्याचा प्रयत्न; वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

अनेक ठिकाणी बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीरपासून हिमाचल प्रदेशपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होत (Weather Today) आहे. रविवारी, उत्तर तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. हवामान खात्याच्या अहवालानुसार या आठवड्यात हवामानात फारसा बदल होणार नाही.

या आठवड्यातील तापमान

आज किमान तापमान नऊ तर कमाल तापमान 21 अंशांवर पोहोचले आहे. तर मंगळवारी किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 10 आणि 21 अंश राहील. त्याचप्रमाणे बुधवारी किमान तापमान 11 आणि कमाल 20 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, गुरुवारी किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 10 आणि 19 अंश असू शकते.

Weather Update
Unseasonal Rain: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com