HIMACHAL PRADESH HORRIFIC ACCIDENT: 6 TOURISTS DEAD AFTER INNOVA FALLS INTO 300-METRE GORGE Saam Tv
देश विदेश

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कार ३०० फूट खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू

Himachal Pradesh Highway Car Accident : हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून इनोव्हा गाडी ३०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर महामार्गावर भीषण अपघात

  • इनोव्हा गाडी ३०० मीटर खोल दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू

  • गाडीतील सर्व प्रवासी गुजरातचे पर्यटक

  • मुसळधार पाऊस आणि धोकादायक वळणांमुळे अपघात झाल्याचा अंदाज

  • चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. चंबा जिल्ह्यातील काकिरा भागात पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा क्रिस्टा गाडी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतील सर्व प्रवासी हे गुजरातचे होते. मनालीवरून दालहौसीकडे जात होते. अपघाती कारमधून १० प्रवासी प्रवास करत होते. अपघाताच्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता रात्रीचा वेळ आणि डोंगराळ भागातील अवघड वळणे यामुळे कार अनियंत्रित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कार अनियंत्रित होऊन तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अंधार आणि खोल दरीमुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे महामार्गांवर अधिक सुरक्षाव्यवस्था आणि धोकादायक वळणांवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT