Hijab Controversy In Supreme Court Saam Tv
देश विदेश

Hijab controversy: सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी घेण्यास नकार, म्हटले खळबळ...

वकील देवदत्त कामत यांनी हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीची मागणी केली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वकील देवदत्त कामत यांनी हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लवकर सुनावणीची मागणी केली आहे. 28 मार्चपासून परीक्षा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करावी.

लवकर सुनावणीची मागणी नाकारणे

देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा म्हणाले, "परीक्षांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्याचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण करू नका. याआधीही न्यायालयाने (court) हिजाब वादावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता, कारण होळीच्या सुट्टीनंतर यावर विचार केला जाईल. गुरुवारी हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. यादरम्यान वकील कामत म्हणाले की, 28 मार्चपासून विद्यार्थ्यांच्या (students) परीक्षा होणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हिजाब घालून प्रवेश न दिल्यास, मग त्यांचे एक वर्ष वाया जाईल.

हे देखील पहा-

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जानेवारी महिन्यात कर्नाटकात हा वाद सुरू झाला. येथील उडुपीच्या (Udupi) सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब (Hijab) परिधान केलेल्या ६ विद्यार्थिनींना कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नाही. कॉलेज प्रशासनाने यामागे ड्रेस कोडमध्ये समानतेचा हवाला दिला होता. हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाविद्यालयाचा हा निर्णय घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने सुनावणी घेतल्यानंतर हे प्रकरण ९ फेब्रुवारी रोजी मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. 11 दिवसांच्या सुनावणीनंतर मोठ्या खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला आणि इस्लामिक श्रद्धेनुसार हिजाब अनिवार्य नसल्याचे सांगितले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT