Ghazipur Bus Fire Saam Tv
देश विदेश

Ghazipur News: गाझीपूरमध्ये वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसवर पडली हायटेंशन वायर; अनेकजण आगीत होरपळल्याची भीती

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश येथील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Satish Kengar

Uttar Pradesh News:

उत्तर प्रदेश येथील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेकजण होरपळल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या बसमध्ये 50 प्रवासी होते, अशी माहिती मिळत आहे. बस एका लग्न समारंभातून परतत होती. त्यावेळी मरदह येथे हा अपघात झाला. या अपघातानंतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मऊ येथील कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन बस मरदह येथील महाहर धाम येथे येत होती. त्यावेळी बसचा अपघात झाला. बसमध्ये 50 हून अधिक लोक होते, असं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वाराणसीचे पोलीस अधिकारी ओपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभातून परतत असताना या बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. यात अनेक लोक होरपळले आहेत. घटनासथळी बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT