Hidden cAMERA Saam TV
देश विदेश

धक्कादायक! मुलींच्या वॉशरुमध्ये कॅमेरा बसवून काढले तब्बल 1200 व्हिडीओ; आरोपीला अटक

विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आरोपीने मुलींच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता.

साम टिव्ही ब्युरो

बंगळुरु : कर्नाटकात गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा बसवून तरुणाने विद्यार्थिनींचे जवळपास १२०० अर्ध नग्न व्हिडीओ शूट केले आहे. या खळबळजनक घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे असून त्यांची चौकशी सुरु आहे. शुभम एम आझाद असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

होसाकेरेहल्लीजवळील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आरोपीने मुलींच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. त्याने १२०० हून अधिक व्हिडिओ आणि मुलींचे फोटो काढले आहेत.

आरोपी शुभमनं त्याच्या मैत्रिणीचे देखील अर्धनग्न फोटो काढले होते. वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवताना मुलींना त्याला पकडलं, मात्र तेव्हा त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वसतिगृहात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि हा प्रकार उघडकीस आला.

यापूर्वीही शुभमनं असंच कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लेखी माफीनामा सादर केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. मात्र आता महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फोन जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी पी कृष्णकांत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं आहे. विविध कलमांअंतर्गत आरोपीविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT