Viral Video : अबब ! केस कापण्यासाठी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून सलूनमध्ये पोहोचला, पुढे जे घडलं...

अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइल करतात.
Viral Video
Viral Video Saam Tv

Viral Video : तुम्ही सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील? पण तुम्‍ही ब्रेन फ्रीजिंग हेअर कट पाहिला आहे का? हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचेही डोके गोठून जाईल.

अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइल करतात, परंतु सध्या सोशल मीडियावर एक ब्रेन फ्रीजिंग हेअर कट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिवाळ्यात बर्फाचे नाव ऐकले की थरथर कापायला होते. पण या व्यक्तीने बर्फाचा डोंगर डोक्यावर घेऊन, त्याच्या हेअर कटची सेटिंग पूर्ण करण्यासाठी सलूनमध्ये पोहोचतो. चला तुम्हाला हा मजेदार व्हिडिओ देखील दाखवू, ज्यामध्ये एक व्यक्ती ब्रेन फ्रीजिंग हेअर कट करताना दिसत आहे आणि यूजर्स त्यावर मजेदार कमेंट करत आहेत.

Viral Video
VIDEO Viral: परदेशी मुलीचा बॉलिवूड गाण्यावर सूपर डान्स, बघणाऱ्यांकडून टाळ्या-शिट्ट्या वाजवून दाद

हेअरकट करतानाचा व्हायरल व्हिडिओ -

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर rjabhinavv नावाच्या पेजवरून शेअर केला आहे आणि त्यावर लिहिले आहे, 'हेअरकट ऑन द रॉक्स...' या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस डोक्यावर चक्क बर्फाची लादी घेऊन सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसला आहे. बर्फाची लादी कापण्यासाठी सलूनचालक कात्री नव्हे तर रोलिंग पिन वापरतो आणि बर्फाचा थोडासा तुकडा तोडतो आणि व्हिस्की, कोक बाहेर काढतो आणि म्हणतो की आठवड्यातून एकदा केस कापायलाच पाहिजे, कारण इथे बर्फ संपला आहे.

Viral Video
VIRAL VIDEO : मध्य रात्री सुरक्षा रक्षकाचा भूताशी संवाद ? काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

रुह अफजा मिक्स करून हेअर कलर केला -

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ४.५ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे आणि मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, 'पुढच्या वेळी त्यात थोडा रुह अफजा मिसळलात तर तेही लाल होईल'. तर अन्य एका यूजरन म्हटलं की, 'त्याच्या कवटीत रक्ताभिसरण नीट होत नाही का?' मजेशीर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'भाई, पुढच्या वेळी बर्फाचा गोळा नक्की बनवा'.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com