Hemant Soren Oath as CM Of jharkhand  Saam Tv
देश विदेश

Hemant Soren Oath : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री! जिथून अटक झाली, तिथेच १५६ दिवसांनी घेतली शपथ

Hemant Soren Oath as CM Of jharkhand: हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

Satish Kengar

झारखंडमध्ये पुन्हा एकदा सोरेन सरकार स्थापन झालं आहे. हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. रांची येथील राजभवनात राज्यपालांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेनही उपस्थित होते.

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी समारंभात शिबू सोरेन व्यतिरिक्त, कल्पना सोरेन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन देखील उपस्थित होते. याशिवाय राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचेही अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना राजभवनातूनच अटक करण्यात आली हाती. आता पुन्हा एकदा त्यांनी १५६ दिवसांनी येथूनच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आता पक्षाच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी असतील. चंपाई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतरच हेमंत सोरेन यांनी नव्या सरकारसाठी दावा केला होता आणि शपथ घेतल्यानंतर ते नवे मुख्यमंत्री झाले आहेत. आता हेमंत सोरेन त्यांचे नवे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहेत.

मुख्यमंत्री शपथ घेण्याआधी हेमंत सोरेन यांनी एक व्हिडीओ संदेशात म्हटले होते की, 'पाच महिन्यांपूर्वी सत्तेच्या नशेत असलेल्या अहंकारी लोकांनी मला गप्प करण्याचा प्रयत्न केला. आज झारखंडच्या लोकांचा आवज पुन्हा बुलंद होणार.'

हेमंत सोरेन म्हणाले की, ''या ठिकाणाहून मी तुम्हाला एक संदेश दिला होता की, विरोधकांनी आमच्याविरोधात कसा कट रचला आणि त्यात ते यशस्वी झाले. मला पाच महिने तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही कायदेशीर लढाईचा मार्गही स्वीकारला. अखेर न्यायालयाने माझी निर्दोष सुटका केली. मी आज पुन्हा तुमच्या समोर आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: शरीराच्या 'या' भागातील वेदना सांगतात लिव्हर कॅन्सर झालाय; चुकूनही दुर्लक्ष करू नका

मीनाताई ठाकरेंच्या स्मृती स्थळावर लाल रंग लावला, शिवसैनिक आक्रमक, दादरमध्ये तणाव वाढला

Kolhapur : कोल्हापुरात आज दिवसभर अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद | VIDEO

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरूवात, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले

SCROLL FOR NEXT