Hemant Soren Saam Tv
देश विदेश

Hemant Soren: झारखंडमध्ये सत्ता परिवर्तनाची तयारी सुरू, हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेणार?

Jharkhand Politics: तरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेऊ शकतात. यासाठी जेएमएमने तयारीही सुरू केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडीच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कथित जमीन घोटाळ्यात सोरेन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री झालेल्या चंपाई सोरेन राजीनामा देणार आहेत. त्यांना जेएमएम पक्षाचं कार्याध्यक्ष बनवलं जाऊ शकतं. सध्या हेमंत सोरेन हे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष आहेत.

जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर 28 जून रोजी हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका झाली. अटकेनंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

यानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि मंत्री चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवण्यात आली होती. चंपाई यांनी 2 फेब्रुवारी रोजी राज्याचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

सोरेन हे तुरुंगाबाहेर आल्यापासून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होती, अशी चर्चा सुरू होती. 1,500 शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमासह मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहे. यामुळेच काही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मंगळवारीही त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

दरम्यान, येत्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका होणार असताना राज्यात नेतृत्व बदल होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीने चांगली कामगिरी केली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर हेमंत सोरेन भाजपवर आक्रमक झाले. विधानसभेतही ते भाजपचा पराभव करण्यासाठी आतापासूनच योजना आखत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

SCROLL FOR NEXT