Ambadas Danve Regret : सभागृहातील प्रकारावर अंबादास दानवेंकडून दिलगिरी; सभापती निलंबन मागे घेणार?

Maharashtra Monsoon Session : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSaam Digital
Published On

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. सभापती निलम गोऱ्हे यांनी ५ दिवसांसाठी निलंबित केलं होतं. विरोधी पक्ष नेत्यावर अशी कारवाई राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच झाली असेल. त्यावर आज अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर सोमवारी लोकसभेत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली होती. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महापुरुषांनी कधीही दुसऱ्याला भीती दाखवू नका, अशी शिकवण दिली होती. मात्र भाजप भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे असल्या आरोप केला होता. त्यावर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी विधान परिषेदत निषेध प्रस्ताव मांडला. यावरून अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन खडाजंगी झाली. दानवेंनी लाड यांना शिवीगाळ केली. दोन्ही नेत्यांना वाद झाल्यानंतर सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचं कामकाज स्थगित केलं होतं आणि मंगळवारी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं होतं.

काय म्हणाले अंबादास दानवे?

सभागृहाचा सदस्य म्हणून सातत्यांने सभागृहाची पावित्र, नियम, प्रथा आणि परंपरा परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र १ जुलै रोजी अनावधाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केलं. शिवसेना पक्षप्रमुखांनीही यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी दिलगिरी व्यक्त करण्यात माझ्या मनात कोणताही किंतू नाही.

Ambadas Danve
Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ, शिंदे सरकारचा निर्णय; VIDEO

सभागृहाचं कामकाज सुरू असून मला शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचे प्रश्न मांडायचे आहेत. जेणेकरून सरकार त्या प्रश्नांना न्याय देईल. त्यामुळे माझं निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यापासून रोखणे असं होईल. त्यामुळे माझ्या निलंबनावर फेरविचार करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

Ambadas Danve
VIDEO: 'कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जावे', कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या विधानावरुन शेतकरी संतापले; माफीची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com