Karnataka: Temperatures remain soothing amid continuous rain showers in Bengaluru
Karnataka: Temperatures remain soothing amid continuous rain showers in Bengaluru Twitter/@ANI
देश विदेश

कर्नाटकात उन्हाळ्यात मुसळधार पाऊस, व्हिडिओ पाहा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बंगळूर : कर्नाटक राज्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पावसाने अचानक हजेरी लावल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. कर्नाटकाच्या (Karnataka) बहुतांश भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यानंतर मंगळवारी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात या आठवडाभर जोरदार प्री-मॉन्सून पाऊस पडणार आहे. (Karnataka | Temperatures remain soothing amid continuous rain showers in Bengaluru)

हे देखील पाहा -

केरळ आणि तामिळनाडूमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक हिल स्टेशन्सच्या खाली तापमान घसरले आहे. तेथे पुढील चार दिवस पाऊस पडेल. IMD ने म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये १६ ते १८ मे आणि लक्षद्वीप परिसरात १६ आणि १७ मे रोजी मुसळधार पाऊस पडेल. १८ मे ला किनारपट्टी आणि दक्षिण भागातील कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळसाठी, आयएमडीने मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यातील इतर सर्व जिल्हे यलो अलर्टवर आहेत.

मच्छिमारांना केरळच्या किनाऱ्यापासून दूर समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, राज्यातील किनारी आणि डोंगराळ भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी, कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे मंगळुरूहून हुब्बल्ली, कोचीन आणि कोईम्बतूरला जाणारी तीन उड्डाणे वळवण्यात आली. दक्षिणेकडील राज्यातील सखल भाग पाण्यात बुडाला. सोमवारी, व्हाईटफिल्ड, सर्जापूर, कोडीगेहल्ली, हेब्बल आणि येल्हंका परिसर पावसामुळे प्रभावित झाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Rahul Gandhi News : रायबरेलीतून राहुल गांधीं लढवणार लोकसभा, प्रियंका गांधी कुठली पोटनिवडणूक लढवणार?

Educational Tips: 'या' कारमांमुळे मुलं परिक्षेत अपयशी ठरतात

Today's Marathi News Live : मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

SCROLL FOR NEXT