Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (3 may 2024): देश विदेश आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी संबंधित बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर
3 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
3 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

संभाजीनगर शहरातील रोशन गेट- किराडपुरा भागात गॅसचा स्फोट

अग्निशामक दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यात काहीअंशी यश

गॅस सिलिंडर चा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आजच भरला. विशेष म्हणजे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्या पत्नी सुप्रिया अमोल कीर्तीकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती दिलीय.

राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच नो एन्ट्री

पनवेलहून मावळ चे शिवसेनेचे संजोग वगैरे सभेसाठी आले होते...

महाविकास आघाडीची सभा असताना उमेदवार संजोग वाघेरे ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते...

मात्र राहुल गांधी आल्यानंतर संजोग वाघेरे यांना पोलिसांकडून आतमध्ये सोडण्यास मनाई करण्यात आली..

या दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक...

राहुल गांधींची सभा संपेपर्यंत संजोग वाघेरे यांना स्टेजवर सोडलेच नाही...

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

ठाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या बैठका सुरु

मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताहेत

कार्यकर्त्यांनी वादविवादात पडू नका

एकमताने एकदिलाने सर्वाणी कामं करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

खेड तालुक्यातील मरकळ येथील गादी कारखान्याच्या गोदामाला आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महापालिका,आळंदी नगर परिषद पीएमआरडीएच्या आग्निशामक दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत सुूरू आहेत. यामध्ये गादी कारखान्यासह तीन ट्रक गाद्याही जळून खाक झाल्यात. दरम्यान धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन

जळगावच्या मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

शरद पवार यांचे मुक्ताईनगर मध्ये जल्लोषात स्वागत

फटाक्यांची आतिषबाजी करत शरद पवारांचे मुक्ताईनगर मध्ये स्वागत

अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

स्पिरीट ऑफ काँग्रेस ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या अरुण रेड्डीला अटक

यापूर्वी पोलिसांकडून काहींना अटक करण्यात आली आहे

या प्रकरणी पोलिसांनी २ दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स बजावल होत मात्र ते चौकशीला हजर राहिले नव्हते

उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅड. उज्वल निकम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपा आणि महायुतीकडून मोठे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले उमेदवारी अर्ज भरतेवेळी निकम यांच्यासोबत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आमदार पराग अळवणी आणि महायुतीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या महिलेला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर या अगोदर देखील अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का?याचा तपास नवघर पोलीस करत असल्याची माहिती उपायुक्त परिमंडळ ०१ प्रकाश गायकवाड यांनी दिली.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

भाजपचे तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. आमदार पाटील यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. यावेळी पाटील यांनी जरांगे यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा देवून यथोचित सत्कार केलाय.

मतदानाच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय

नागरिकांना मतदान केंद्रावर विनाव्यत्यय पोहचता यावे यासाठी महामुंबई मेट्रोचा निर्णय

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो 'मतदार जागरूकता आणि सहभाग उपक्रमात सहभागी

मेट्रो मार्ग 2 अ आणि सातच्या प्रवाशांना 20 मे रोजी मूळ तिकिटावर दहा टक्के सवलत

ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार

नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात;  बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना भरधाव सिमेंट बलगर चालकाचा बलगर वरील ताबा सुटल्याने बलगरने पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन बलगर पलटी झाला. पलटी झाल्यावर सिमेंट बलगरने पेट घेतला. यात बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम व मुंबई नाशिक एक्सप्रेस वे च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमीस पुढील उपचारासाठी शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवून बलगर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला .

नाशिकच्या हिरावाडीत भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

नाशिकच्या हिरावाडी परिसरात गाड्यांना भीषण आग

गाड्यांना आग लागल्यानं परिसरात आगीचे प्रचंड लोट

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

आगीच कारण अद्याप अस्पष्ट

अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

रावेर पुणे बस अजिंठा घाटात ओव्हर टेक करत असताना पलटी झाली आहे. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी उमेदवार मीच असणार असे सांगितलं. यावेळी बोलताना वैशाली दरेकर यांनी पक्ष आदेश देतो त्याप्रमाणे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत असतात ,त्यांना पक्षाने आदेश दिलाय त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरला . पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला आहे ..पक्षाचे रणनीती असते एक फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतलाय . वैशाली दरेकर राणे कधी कोणाला घाबरलेले नाही कधी घाबरत नाही माघार घेणार नाही मी फॉर्म भरला आहे ,इलेक्शन होणार 20 तारखेला मतदान होणार ,चार तारखेला मशाल लोकसभेत पोहोचणार असे वैशाली दरेकर यांनी सांगितले

राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

⁠आधी राहुल गांधी ४.३० वाजता सभेच्या ठीकाणी येऊन ६ वाजता सभा संपवून जाणार होते.

आता राहुल गांधींची सभा सहा नंतर सुरु होईल

सभेनंतर राहुल गांधी दिल्लीला जाणार

⁠पुणे विमानताळवरुन राहुल गांधी आधी कोरेगाव पार्क भागातील कॅानरॅड हॅाटेलवर जाणार

⁠कॅानरॅड हॅाटेल वरुन राहुल गांधी सभेच्या ठीकाणी येणार

⁠एसएसपीएमएस कॅालेजच्या मैदानावर होत आहे सभा

अमोल कोल्हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते; प्रविण दरेकर यांचा दावा

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते. असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. हा आरोप करतानाचं शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पहावा. अशी खोचक टीका ही दरेकरांनी केली. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी दरेकर आले होते.

नाशिक जिल्ह्यातील २३३ गावं आणि ५३५ वाड्यांवर भीषण दुष्काळाची स्थिती

जिल्ह्यातील २३३ गावं आणि ५३५ वाड्यांवर दुष्काळी परिस्थिती

तब्बल ५ लाख नागरिक, २ लाख जनावरांना २५५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा

नांदगाव तालुक्यात ६४, येवला ४५, मालेगाव ३६, चांदवड १५, देवळा १४, सिन्नर १७, सुरगाणा ०२ आणि इगतपुरी तालुक्यात १ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यातील जवळपास १४४ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहित

जिल्ह्यातील लहान मोठ्या २४ धरण प्रकल्पांमध्ये अवघा २७ टक्के पाणीसाठा शिल्लक, तर २ धरणं कोरडीठाक

राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

राहुल गांधी एक प्रवासी आहेत, ते जागा बदलत राहतात

देशात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी चे आपण स्वागत करतो पण त्यांचे इथे घर बसवले जात नाही

अमेठी जावो किंवा रायबरेली जाऊद्या तीच परिस्थिती कायम राहील

सगळ्या गोष्टी पारदर्शक आहेत. आत्तापासून हरवल्यापर्यंत काय काय बोलता येईल यासंदर्भात बहाणे शोधण्याचे काम चालू आहे

राहुल गांधीच्या सभेनंतर मोदींजी यांचे आणखी महत्व पुणेकरांना कळेल

खरी शिवसेना शिंदेंकडे; अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

मी आज तुमच्यासमोर आलो आहे

इथूनच शिवाजी महाराजांनी दिल्लीच नाही तर समुद्रावर हिंदुत्वाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होत

इथं टिळकांचाही जन्म झाला, टिळक म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यांनी इंग्रजांना ललकारले होते

सावरकरांनी इथंच क्रांतिकारी गोष्टी केल्या

उद्धव ठाकरे सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिम्मत करू शकतात का ?

हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच

ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

मोदी सरकारने गरीब जनतेला घरं दिली.

तिसऱ्यांदा पंतप्रधान जेव्हा होतील तेव्हा देशाला महासत्ता बनवायचं काम करू.

महिला, युवक आणि गरीबांसाठी काम करु.

आमचे विरोधक काय बोलतात?

विकासावर बोलत नाही

लोकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत.

१० वर्ष उद्धव ठाकरेंचे खासदार होते

काय केलं, काही नाही

नुसत टीका केल्या.

तीन दिवस आहेत यांचा असा पराभव करा की त्याचा डिपाॅजिट करा

हेलिकॉप्टर दुर्घटनेवरून भरत गोगावले यांचं विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र

विनायक राऊत यांचा आमदार भरत गोगावले यांनी घेतला समाचार

सुषमा अंधारे हेलिकॉप्टर दुर्घटने प्रकरणी वक्तव्य करणाऱ्या विनायक राऊत यांच्या अकलेची किव केली पाहिजे

० जमिनीवर धावणाऱ्या गाडीचा पमचर करता येते, हेलिकॉप्टर हवेतुन आल. येथून आल त्यांना विचारा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होता काय

० पाया खालची वाळू सरकायला लागल्याने आरोप प्रत्यारोप करून लोकोच लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न

० परंतु रायगडची जनता या हवाना बळी पडणार नाही

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात, ४ जण ठार

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात.

अपघातात 4 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती.

या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होते.

दोन गाड्या आमनेसामने धडकून अपघात झालाय.

अकोला जिल्ह्यातील पातुर शहरा नजीक अपघात झालाय.

तर अपघातात काही जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

अपघातात दोन्ही वाहनाचा चुराळा, आतापर्यंत मृतकांचे नावे आणि आकडा समजू शकला नाही..

दिंडोरी, नाशिकमध्ये वंचितच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती थविल आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करण्यासाठी वंचित आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची प्रतिक्रिया वंचित आघाडीचे नाशिकचे उमेदवार करण गायकर यांनी दिलीय.

PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे भाषणात काय म्हणाले?

मी घरात बसून काम करत नाही. यापूर्वी ही तिकडे असताना मीच काम करत असायचो.

पंतप्रधानांप्रमाणे मी ही एकही सुट्टी न घेता काम करतोय.

पाकिस्तानने देशाकडे वटारून पाहिलं तर पाकिस्तानात घुसुन मारू.

यापूर्वी ही सर्जिकल स्ट्राईक करुन घुसलो होतो

राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरला

राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरला आहे.अर्ज दाखल करताना राहुल यांच्यासोबत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी उपस्थित होते.

Thane Lok Sabha : ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरला

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांनी अर्ज भरला.

राज्यातील पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता.

मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा

आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

कोर्टाने ED आणि CBI ला नोटीस पाठवून मागितलं उत्तर

राऊज अवेन्यू कोर्टाने सिसोदिया यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली होती

Nashik lok Sabha : ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

- ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

- अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विजय करंजकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

- ठाकरे गटाने उमेदवारी डावलून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं करंजकर यांचा बंडाचा झेंडा

- ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली

Lok Sabha Election : बिग बॉस फेम एजाज खान निवडणुकीच्या मैदानात

अभिनेता एजाज खान निवडणुकीच्या मैदानात

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

अभिनेता एजाज खान वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचला

बिग बॉस या शोमध्ये एजाज खान दिसून आला होता

Thane Lok Sabha : नाईक कुटुंब नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी ठाण्यात पोहोचले

भाजप आमदार गणेश नाईक ठाण्यात दाखल.

गणेश नाईकांसोबत माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक

मात्र नवी मुंबईतील एकही भाजप पदाधिकारी नाईकांसोबत नाही.

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता नाईक कुटुंब पोहोचलं

Narendra modi : डरो मत आणि ते स्वतः पळून गेले; PM मोदींची राहुल गांधींवर टीका

पश्चिम बंगाल -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

राहुल गांधी बोलतात की डरो मत आणि ते स्वतः पळून गेले

घाबरून वायनाडवरून रायबरेलीला गेले

मी आधीच सांगितल होतं, यांचे मोठे नेते निवडणुका लढणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या रायबरेली निवडणूक लढवण्यावरून मोदींची टीका

Thane Lok sabha : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

भाजप आमदार गणेश नाईक हे नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार

काल भाजप पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला केला होता विरोध

गणेश नाईकांबरोबर नवी मुंबई भाजपचा एकही पदाधिकारी जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

पुढील तीन ते चार दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

फडणवीसांची बैठक होत नाही तोपर्यंत भाजप पदाधिकारी प्रचारात उतरणार नाही.

Ram Satpute : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स व्हायरल करून जनमाणसात प्रतिमा मलीन केल्याने गुन्हा दाखल

भारतीय दंड संहिता कलम 500 आणि 501 नुसार दाखल करण्यात आला गुन्हा

भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Yamini Jadhav : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

शिंदे गटाकडून मुंबई दक्षिण मतदारसंघासाठी आमदार यामिनी जाधव या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सकाळी महालक्ष्मीच दर्शन घेत त्यांनी आपल्या दिवसाला सुरुवात केली. 'नगरसेवक, आमदार या पायऱ्या चढत मी जाते आहे. पती यशवंत जाधव यांनी 43 वर्षा शिवसेनेला दिली आहे.. १७ व्या वर्षापासून ते शिवसेनेत आहेत, त्यांची पुण्याई माझ्यापाठी आहे, अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी यावेळी दिली.

Mahad News :  महाडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश

सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश

महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं

सुषमा अंधारे सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

Ravindra Waikar : रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार

रवींद्र वायकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार

रवींद्र वायकर हे आज शक्ती प्रदर्शन करत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार

जोगेश्वरी पूर्वेकडील इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेऊन वांद्रे येथे निघणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार भाजपाचे आणि मित्र पक्षांचे आमदार अर्ज भरण्यासाठी वायकर यांच्यासोबत उपस्थित राहणार

अकरा वाजता महाडा कार्यालय येथे जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शक्ती प्रदर्शन करत वायकर आपला उमेदवारी अर्ज भरणार

Naseem khan News : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

काँग्रेसच्या नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज नसीम खान आहेत

काँग्रेस हायकमांडने नसीम खान यांनी पुण्यात बोलावले

रमेश चेन्नीथला यांनी फोन करून नसीम खान यांना पुण्याला बोलावले

पुण्यात आज राहुल गांधीजींच्या सभेसाठी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत

तिथेच नसीम खान यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढणार

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी प्रतिभा पवार आज लावणार महिला मेळाव्याला हजेरी...

बारामतीमध्ये पार पडणार महिला मेळावा

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळाव्याचं आयोजन

या मेळाव्याला प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे सुषमा अंधारे,सुनंदा पवार, शर्मिला पवार, रोहित पवार राहणार उपस्थित...

अमित शहा कोल्हापुरात पोहोचले; श्री अंबाबाईचेदर्शन घेणार

गृहमंत्री अमित शहा हे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन थोड्याच वेळात घेणार

अमित शहा कालपासून आहेत कोल्हापुरात

अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पुन्हा बैठक घेण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.