पाऊस नसेल तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत? सुप्रीम कोर्टाचा सवाल

राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
Supreme Court
Supreme Court Saam Tv

नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य निवडणूक आयोगाला जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा-

ओबीसी आरक्षणाने (OBC reservation) राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाविषयी सध्या सुप्रीम कोर्टात निवडणुकांबाबत सुनावणी सुरु आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात असे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सुचवले आहे. याबरोबरच ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत नाही, असेही कोर्टाने यावेळी सांगितले आहे.

Supreme Court
'त्या' कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करतील- गृहमंत्री...(पाहा व्हिडिओ)

पुढील काही दिवसांत पावसाळा सुरु होणार, यादरम्यान राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. पण निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता ज्या ठिकाणी पाऊस नाही. त्याठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असे कोर्टाने विचारल्याने जिथे पाऊस नसेल तिथं आधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर जिथे पाऊस असेल त्याठिकाणी नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकणार आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याअगोदरच सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश देण्यात आले होते की, ओबीसी आरक्षणाविना २ आठवड्यामध्ये निवडणूक प्रक्रिया जाहीर करावी. यानंतर राज्यात १४ महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची सध्या लगबग सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com