उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बायको प्रियकरासोबत पळून गेली हा धक्का सहन न झाल्याने एका वकिलाने आत्महत्या केली. कमल कुमार असं आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. ८ वर्षांपूर्वी या वकिलाचे कोमलसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. कोमलला एका तरुणासोबत प्रेम झाले आणि ती नवरा आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वकील कमल कुमार यांची बायको कोमल अचानक घरातून गायब झाली. सुरूवातीला त्यांना वाटले की माहेरी गेली असावी. पण नंतर कळाले की ती प्रियकर अमरसोबत पळून गेली. बायको पळून गेल्याचे वृत्त कळताच कमल कुमार यांना मोठा धक्का बसला. बायकोने केलेल्या या कृत्याचा धक्का सहन न झाल्याने वकिलाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली.
कमल कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, माझी बायको इन्स्टाग्रामद्वारे तिच्या प्रियकराच्या संपर्कात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकण्यास नकार दिला. बायको प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर कमल कुमारने नैराश्येत येऊन राहत्या घरी विष प्राशन केले. त्यांच्या कुटुंबीयांना बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल कले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
उपचारादरम्यान, डॉक्टरांना वकिलाच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली. त्यात कमल कुमारने त्याच्या मृत्यूसाठी बायको आणि तिच्या प्रियकराला जबाबदार धरले. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, 'मी आता जगू शकत नाही. माझे जाणेच आता योग्य राहिल. ज्यांनी मला आणि माझ्या मुलांचा विश्वासघात केला. त्यांच्याजवळ माझ्या मुलांना अजिबात जाऊन देऊ नका.' सुसाईड नोट वाचल्यानंतर कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. सध्या वकिलाची बायको आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, वकील आणि कोमला साडेतीन आणि साडेपाच वर्षांचा मुलगा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.