मार खाऊन बक्कळ पैसा कमावते ही व्यक्ती
मार खाऊन बक्कळ पैसा कमावते ही व्यक्ती saam tv
देश विदेश

काय सांगता! मार खाऊन बक्कळ पैसा कमावते ही व्यक्ती

वृत्तसंस्था

मुंबई : आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्ध्येच्या जगात चिंता ही माणसाच्या मानगुटीवर वेताळाप्रमाणे येऊन बसली आहे. कितीही प्रयत्न केला तरी ही चिंता (stress) काही माणसाच्या आयुष्यातून कमी होत नाही. मग त्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. कुणी मेडिटेशन (Meditation) करतं, तर कुणी संगीत, डान्स, पुस्तकं याची मदत घेतं. पण, असेही काही असतात ज्यांना या शांत पद्धतीने आपलं मन शांत करायचं नसतं. त्यांना ओरडून किंवा एखाद्याला मारुन आपला राग व्यक्त करायचा असतो. गेल्या बऱ्याच काळापासून तुर्कीमधील एक व्यक्ती अशा लोकांची मदत करत आहे. ही व्यक्ती लोकांचा मार खाते आणि त्यांचं टेंशन कमी करते. म्हणून तिला तुर्कीची ह्यूमन पंचिंग बॅग (Human Punching Bag of Turkey) असेही म्हटले जाते. - Hasan Riza Gunay The Human Punching Bag of Turkey

तुर्कीचा हसन रिझा गुने (Hasan Riza Gunay) गेल्या 10 वर्षांपासून स्ट्रेस कोच (Stress Coach) म्हणून काम करत आहे. तो तुर्कीचा पहिला स्ट्रेस कोच मानला जातो. हे ऐकून असे वाटेल की तो रुग्णांवर मानसशास्त्रज्ञांसारखे उपचार करतो. पण, तसे नाही. त्याची उपचार करण्याची पद्धत अत्यंत विशिष्ट आहे. हसन हा चिंताग्रस्तांकडून स्वत:ला मारहाण करवून घेतो. यातून तो पैसा कमावतो. 2010 पासून त्याने स्ट्रेस कोच म्हणून काम सुरु केले.

हसनचा असा विश्वास आहे की लोकांच्या जीवनात खूप तणाव आणि चिंता असतो. अनेक वेळा कोणाकडे मन मोकळे करुनही चिंता कमी होत नाही. अशा परिस्थितीत तो अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो जे आपला राग व्यक्त करू शकत नसल्यामुळे राग मनात ठेवतात आणि नैराश्याला बळी पडतात. 2010 पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. आता त्यांनी लोकांना कोणतेही उत्तर न देता स्वत:ला मारण्याची संधी देतात. जेणेकरुन त्यांचा ताण कमी होईल.

बहुतेक क्लांयट या महिला असतात

हसनने सांगितले की, तो दररोज 3 ते 4 क्लायंटसोबत 10 ते 15 मिनिटांचे सेशन करतो. या सेशनदरम्यान, तो सुरक्षा उपकरणे घालतो जेणेकरुन त्याला गंभीर दुखापत होऊ नये. तसेच, कुणाचं मनोरंजन करण्यासाठी तो मार खात नाही, असेही त्याने सांगितले. तो प्रथम त्याच्या रुग्णाची तपासणी करतो आणि जर त्याला वाटले की ती व्यक्ती खरोखरच तणावाखाली आहे तर तो त्याला पंचिंग थेरपी देतो. त्याचे 70 टक्के क्लायंट या महिला असतात आणि बर्‍याचदा ऑफिसमध्ये किंवा नोकरीमुळे त्रासलेले लोक असतात.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

SCROLL FOR NEXT