Haryana Shocker Saam
देश विदेश

शाळेसमोर भीषण अपघात, पोलिसाच्या कारने ३ विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

Haryana Shocker: पोलिसांच्या भरधाव गाडीने रस्त्यावरून चालत असलेल्या तीन मुलांना धडक दिली. स्थानिकांनी पकडलेल्या गाडीचालकाची ओळख पोलिस कर्मचारी म्हणून झाली आहे.

Bhagyashree Kamble

  • हरियाणाच्या पलवलमध्ये पोलिसांच्या भरधाव गाडीखाली तीन विद्यार्थी चिरडले.

  • दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, एक गंभीर जखमी.

  • स्थानिकांनी आरोपी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

  • पीडितांच्या तक्रारीवरून आरोपी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल.

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील उतावद गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसाच्या भरधाव गाडीखाली तीन शालेय विद्यार्थी चिरडले गेले. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गु्न्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी हे उटावड गावातील रहिवासी होते. अयान (वय वर्ष १३), अहसान (वय वर्ष ३) असे मृत मुलांचे नाव आहे. तर, मोहम्मद अर्जन (वय वर्ष ७) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही सरकारी शाळेतील विद्यार्थी होते.

ही धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शाळा सुटली. नंतर आजोबा नातवंडांना शाळेतून घरी घेऊन चालत जात होता. रस्त्यावरून जात असताना मागून एका भरधाव कारने तिन्ही मुलांना धडक दिली. आजोबांनी उडी मारली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही मुलं रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले.

स्थानिकांनी कार चालकाला पकडले. तेव्हा कार चालक पोलीस असल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर आरोपी कार घेऊन जाण्याच्या तयारीत होता. स्थानिक लोकांनी त्याला पकडले. तसेच पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. उटावड पोलीस ठाण्यातील अधिकारी एसएचओ रेणू शेखावत यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार मुंबईतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

Hair Care: मऊ आणि शायनी हेअर पाहिजेत? मग केस धुण्याआधी 'हा' घरगुती हेअस मास्क नक्की लावा

Newly Married Bride: लग्नानंतर नव्या नवरीने सासरी गेल्यावर करू नयेत या चुका; सुखी संसारासाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

महिला कलेक्टरला अश्लील मेसेज; सत्ताधारी आमदाराला अटक, राजकारणात खळबळ

Nail Health : नखांचा रंग आणि आकार बदलतोय? शरीरात लोहाची कमतरता असल्याचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT