Police Constable Ends Life Saam
देश विदेश

मोठी बातमी! कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यात पोलीस कॉन्स्टेबलचा आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? गूढ वाढलं

Police Constable Ends Life: कॅबिनेट मंत्र्याच्या घरात आढळला पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह. आत्महत्या ती हत्या? पोलीस तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यात पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह.

  • डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

  • प्राथमिक तपासात विषारी पदार्थ खाल्ल्याचा संशय.

हरियाणातील गुरूग्राममधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उद्योग मंत्री राव नरबीर सिंह यांच्या सरकारी बंगल्यात एका पोलीस कॉन्स्टेबलनं आत्महत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल गार्ड रूममध्ये तैनात होते. एका सहकाऱ्यानं त्यांना खोलीत बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. त्यांनी मंत्री आणि इतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबलला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जगबीर सिंह (वय वर्ष ४९) असे मृत पोलीस कॉन्स्टेबल यांचे नाव आहे. ते झज्जर जिल्ह्यातील सुखपुरा गावचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल जगबीर सिंह हे राव नरबीर सिंह यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा ड्युटीवर कार्यरत होते. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. ही घटना सिव्हिल लाईन्स परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे.

एसएचओ कृष्ण कुमार म्हणाले की, 'आम्हाला संशय आहे की, कॉन्स्टेबलनं विषारी पदार्थ खाल्ले असावे. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच मृत्यूमागचं कारण समोर येईल'. दरम्यान, मृताच्या कुटुंबाने अद्याप यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केलेली नाही. कुटुंबाकडून दाखल झालेल्या तक्रारीनंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT