नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घाटन कधी होणार? नाव काय देण्यात येणार? मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Navi Mumbai International Airport Inauguration: नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणाची तारीख पुढे ढकलली. ३० तारखेला लोकार्पण होणार नाही.
Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International AirportSaam
Published On
Summary
  • नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण ३० तारखेला होणार नाही.

  • गणेश नाईकांची माहिती.

  • विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देण्याची शक्यता.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय. या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी होणार होतं. परंतु, नामंतराच्या वादावरून लोकार्पणाच्या तारखेबाबत संभ्रम पसरवला जात होता. मात्र, या संभ्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या विमानतळाला दि.बा पाटील यांचेच नाव दिले जाणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी आगरी-कोळी भूमीपुत्राकडून केली जात होती. नवी मुंबईतील विमानतळाचा उद्घाटन सोहळा जवळ येत आहे. परंतु, अद्याप तरी विमानतळाच्या नामकरणाविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे नामकरणाविषयी आगरी कोळी बांधव अधिक आक्रमक झाले आहेत.

Navi Mumbai International Airport
रायगडमध्ये अजित पवारांना धक्का! बडे नेते भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल

नवी मुंबईतील विमानतळ नामकरणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटीलही उपस्थित होते. या बैठकीत नामकरणावरून बाळ्या मामा आणि कपिल पाटील यांच्यात वाद पेटलेला पाहायला मिळाला.

Navi Mumbai International Airport
सरपंचाचे फिल्मी स्टाईल अपहरण; हात बांधले, ८०० किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबून ठेवलं, नेमकं काय घडलं?

या विमानतळाच्या तारखेबाबत आणि नामकरणाबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. ३० तारखेला विमानतळाचे लोकार्पण होणार नाही, अशी माहिती नाईक यांनी दिली. यासह या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दी. बा पाटील यांचेच नाव दिले जाणार, अशी संमती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळाली आहे. केंद्र सरकारकडून त्याला अंतिम संमती आल्यानंतर या विमानतळाचे नाव दि.बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच राहिल, असा विश्वास देखील नाईक यांनी व्यक्त केला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com