Police deployed after violent clash in Nuh’s Firozpur Jhirka, Haryana saam tv
देश विदेश

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Haryana Violence: हरियाणातील नूहच्या फिरोजपूर झिरका येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झालेत. काहींनी वाहनांना आग लागल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला त्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Bharat Jadhav

  • हरियाणाच्या नूंहमधील फिरोजपूर झिर्का भागात दोन गटांमध्ये हिंसक झटापट.

  • झटापटीत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती.

  • काही वाहनांना आग लावण्यात आली.

  • परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तैनात.

हरियाणाच्या नूंहच्या फिरोजपूरच्या झिरकामध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीची घटना घडलीय. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. तर कोणी कोणावर काठ्यांनी मारहाण केली. काहींनी एकमेकांवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे १० जण जखमी झालेत. हिंसक हाणामारीची माहिती पोलिसांना मिळताच, पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहे. दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केलीय.

दगडफेक आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला जेव्हा झाला त्यावेळी १० जण जखमी झालेत. दंगलखोरांनी परिसरात अनेक ठिकाणी जाळपोळ केली. यात काही दुकाने आणि वाहने पेटवून देण्यात आली आहेत. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांना इतर पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी लागली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूर झिरका येथील हिंसाचाराच्या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर हा छावणीत रूपांतरित झालाय. डीएसपी दर्जाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. याप्रकरणी माहिती देताना सरपंच राम सिंग सैनी यांनी सांगितले की, फिरोजपूर झिरकाहून त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका स्थानिक माणसाचा मुलगा, ज्याचे नाव इसरा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी आपली कार घेऊन उभा होता. स्थानिक रहिवासी समय सिंग हा तेथे गेला. तेव्हा समयने इसराला गाडी हलवण्यास सांगितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.

वाद सुरू असताना एका तरुणाने गाडीतून बाहेर येऊन काचेच्या बाटलीने समयच्या डोक्यावर वार केले. यानंतर वाद वाढतच गेला. या वादादरम्यान एका मोटारसायकल पेटवण्यात आली. एका दुकानालाही आग लावण्यात आली. सरपंच राम सिंह सैनी यांनी आरोप केला आहे की दुसऱ्या बाजूच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि स्वतः दुकानाला आग लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Special : स्वातंत्र्यदिन होईल खास! घरीच झटपट बनवा तिरंगा पुलाव

Shocking : विहिरीत आढळला २८ वर्षीय महिलेसह दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

Left Handedness People: डावखुऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण, कसे ओळखावे?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये 15 ऑगस्टला शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध

Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

SCROLL FOR NEXT