MLA Rakesh Daulatabad Passed Away 
देश विदेश

MLA Rakesh Daulatabad: हरियाणाचे आमदार राकेश दौलताबाद यांचं निधन, संकटात आलं सैनी सरकार?

Bharat Jadhav

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व 10 लोकसभा जागांवर मतदान होतंय. त्याचदरम्यान गुरुग्रामच्या बादशाहपूरमध्ये एक दुखद घटना घडलीय. येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचे आज शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांची प्रतिमा समाजसेवक अशी होती. परंतु त्यांच्या या निधनामुळ तेथील सैनी सरकार संकटात आले आहे.

सकाळी साडेदहा वाजता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना पालम विहार येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्यावर बराच वेळ उपचार करण्यात आले परंतु डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. राकेश दौलताबाद हे 2019 च्या निवडणुकीत बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार मनीष यादव यांचा पराभव केला होता. अलीकडेच हरियाणात राजकीय उलथापालथ झाली होती. त्यादरम्यान अपक्ष आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढला होता.

दरम्यान दौलताबाद यांच्या निधनामुळे हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे संकट अधिक गडद झालेत. अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यानंतर सरकारसमोर बहुमताचे संकट उभे राहिलंय. हरियाणात भाजपला ४२ आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी भाजपला आणखी २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. दौलताबाद यांच्या निधनाने हरियाणा सरकार संकटात सापडलंय.

हरियाणात सध्या ९० आमदारांच्या सभागृहात एकूण ८७ आमदार आहेत. लोकसभा निवडणूक लढवणारे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि रणजित चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने आणि अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांच्या निधनामुळे ३ आमदार पदे रिक्त आहेत. तर विधानसभेत बहुमताचा आकडा ४४ आहे. सभागृहात भाजपचे ४० आमदार आहेत. अपक्ष आमदार आणि हरियाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांच्या पाठिंब्यानंतर भाजपला एकूण ४२आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी भाजपला आणखी २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दरम्यान राकेश दौलताबाद यांच्या निधनावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह यांनी शोक व्यक्त केलाय. दौलताबाद यांच्या निधनाने हरियाणाच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय. गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनीही राकेश दौलताबाद यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, 'धक्का आणि अत्यंत दुःखी. त्याचा हसरा चेहरा माझ्या नजरेतून हटत नाहीये. बादशाहपूर, गुडगाव येथील आमदार राकेश दौलताबाद यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. कुटुंबाला प्रोत्साहन कसे द्यावे? हे सगळं अचानक कसं झालं? मी प्रार्थना करत आहे. देव कुटुंबाला शक्ती देवो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT