Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात आयुष्य संपवलं; कल्याणमध्ये खळबळ

Kalyan 12th Class Student Akshara Renuse Sucide News : कल्याण पूर्व परिसरात बारावीच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुसाईड नोट सापडली असून आत्महत्येमागील कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात आयुष्य संपवलं; कल्याणमध्ये खळबळ
Kalyan 12th Class Student Akshara Renuse Sucide NewsSaam Tv
Published On
Summary
  • कल्याण पूर्वेत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

  • घटनास्थळी सुसाईड नोट आढळली

  • आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

  • कोळशेवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Crime 12th Class Student Akshara Renuse Sucide कल्याण पूर्व परिसरात बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा नितीन रेणुसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.आत्महत्येपूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिने आईवडिसाठी मजकूर लिहिला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेने रेणुसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षराने घरातील पोटमाळ्यावर गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तातडीने तिला खाली उतरविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी अक्षराने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये "आई बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही" असा मजकूर आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे.

Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात आयुष्य संपवलं; कल्याणमध्ये खळबळ
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

तथापि, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाणे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीवर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण होता का, शैक्षणिक किंवा इतर कारणे होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात आयुष्य संपवलं; कल्याणमध्ये खळबळ
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक ताणतणाव, मानसिक आरोग्य आणि पालक विद्यार्थी संवाद याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com