haryana horrific Accident :  Saam tv
देश विदेश

Horrific Accident : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने चिरडून एकाचा मृत्यू; मध्यरात्री घडला अपघाताचा थरार

haryana horrific Accident : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने चिरडून एकाचा मृत्यू झालाय. फरिदाबादमध्ये मध्यरात्री हा अपघाताचा प्रकार घडला.

Vishal Gangurde

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश लोहान यांच्या नावावर असलेल्या कारने एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे दोन मित्र हे २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वृंदावनमधून सेक्टर १२ मध्ये जेवण घ्यायला गेलो होते. त्यांचा जाताना अर्ध्या रस्त्यात थारच्या कार चालकाशी वाद झाला. दोघांनी तातडीने मनोजला माहिती दिली. त्यानंतर मनोज आणि त्याचे मित्र कारने घटनास्थळी पोहोचले.

दोघांचे मित्र आल्याने थारचा चालक घाबरला. घाबरलेल्या थार चालकाने मनोजला चिरडलं. त्यानंतर थार चालकाने मनोजला चिरडून पळ देखील काढला. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या मनोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनोजचं पोस्टमार्टम फरीदाबादच्या बादशाह खान रुग्णालयात झालं. मनोजच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ही कार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश लोहन यांच्या नावावर नोंद आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

नातेवाईकांनी काय आरोप केला?

फरीदाबादच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कारने चिरडल्याने मनोजचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस आयुक्ताचा मुलगा कार चालवत असल्याचा मनोजच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय. मनोजच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोजच्या मृतदेहाचं पोस्टपार्टम केल्यानंतर नातेवाईक आरोपींच्या अटकेच्या मागणीवर अडून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT