Haryana Faridabad Crime News Saam Tv
देश विदेश

Crime: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं

Haryana Faridabad Crime News: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यावेळी विरोध केल्याने महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. गंभरी जखमी अवस्थेत महिलेला कारमधून बाहेर फेकून आरोपींनी पळ काढला.

Priya More

Summary:

  • हरयाणाच्या फरिदाबादमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

  • लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला कारमध्ये बसवून केलं भयंकर कृत्य

  • दोघांनी धावत्या कारमध्ये महिलेवर आळीपाळीने केला बलात्कार

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली

धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हरियाणाच्या फरिदाबादमध्ये घडली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी एका महिलेला कारमध्ये बसवले. नंतर त्यांनी धावत्या कारमध्ये आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध केला असता त्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून आरोपींनी पळ काढला. पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या म्हणण्यानुसार, पीडित महिला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होती. त्यावेळी त्याठिकाणी एक कार आली या कारमध्ये दोन तरुण बसले होते. आरोपींनी तिला घरापर्यंत सोडतो असे सांगितले त्यामुळे ती महिला त्यांच्यावर विश्वासठेवत कारमध्ये बसली. महिला कारमध्ये बसताच आरोपींनी तिला घरी न सोडता कार गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्याकडे नेली. याठिकाणी दोन तास आरोपींनी कार फिरवली आणि धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

पीडित महिलेने आरोपींना विरोध केला तेव्हा त्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी धावत्या कारमधून या महिलेला जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तिथून ते पळून गेले. रस्त्यावर पडल्याने तिच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्राव झाला. जखमी महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी काही जण तिच्या मदतीला आले आणि त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

जखमी महिलेला सुरुवातीला फरीदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तिची प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पीडित महिलेच्या बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ड) (सामूहिक बलात्कार), ३२३ (जीवघेणा हल्ला) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने दोन्ही संशयितांना अटक केली असून त्यांची कार जप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

पुन्हा मोठा राजकीय भूकंप! एकवेळ भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंसोबत नाही; राऊतांनी बॉम्ब फोडला

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

SCROLL FOR NEXT