Gurugram Builders Office Crime Saam
देश विदेश

मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

Gangster Deepak Nandal: बिल्डरच्या ऑफिसबाहेर गोळीबार. आरोपी दुचाकीवरून आले. अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • बिल्डमार्क ऑफीसवर रात्री गोळीबार.

  • अंदाधुंद गोळीबार.

  • तीन केअरटेकर उपस्थित.

  • पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल.

हरियाणाच्या गुरूग्राम सेक्टर - ४५मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एमएनआर बिल्डमार्क एलएलपी (बिल्डर)च्या ऑफिसबाहेर गुरूवारी गोळीबाराचा प्रकार घडला. रात्रीच्या सुमारास आरोपींनी २५ ते ३० गोळ्या झाडल्या. गोळ्या ऑफिसच्या खिडक्यांना आणि लक्झरी वाहनांना लागल्या. सुदैवाने घटनास्थळी कुणीही उपस्थित नव्हते. दरम्यान, गँगस्टर दीपक नंदलने या गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

एमएनआर बिल्डमार्क कंपनी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स आणि शेतीच्या जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार करते. गुरूवारी सायंकाळी उशिरा कंपनीचे सर्व कर्मचारी घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास ४ आरोपी मास्क घालून २ दुचाकीवरून आले होते. त्यांनी कंपनीच्या बाहेरील लोखंडी गेटवरून उडी मारली. तसेच आत प्रवेश केला. त्यानंतर अंदाधुंद गोळी झाडण्याल सुरूवात केली.

गोळ्या मुख्य गेटच्या काचेवर तसेच गाड्यांना लागल्या. घटनेवेळी तीन केअरटेकर उपस्थित होते. या प्रकरणानंतर केअरटेकर राजेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच स्थानिकांनी देखील माहिती दिली. अचानक गोळीबाराचा आवाज आल्यानं परिसरातील लोक बाहेर आले, असं त्यांनी सांगितलं.

परिसरातील तरूणांनी आरोपींना गोळ्या झाडताना पाहिलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही जप्त केलेआहे. त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बिल्डरच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणत्या ड्राय फ्रुटमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतं?

Bajra ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरीचे लाडू

Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

Amar Kale : किती आत्महत्या झाल्यावर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार?; खासदार अमर काळे यांची सरकारवर जोरदार टीका

उंचावरून उडी मारूनही पायांवर कशा पडतात मांजरी?

SCROLL FOR NEXT