Haryana ED Raids Saam TV
देश विदेश

Shocking News: माजी आमदाराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; नोटा मोजताना मशीन बंद, अधिकारीही थकले

Haryana ED Raids: नोटांचा साठा इतका होता, की पैसे मोजताना मशीन देखील बंद पडले. रात्री १२ वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी (ED) नोटा मोजत होते.

Satish Daud

Chandigarh City ED Action

गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय नेत्यांसह उद्योगपतींवर ईडीने कारवाईचे सत्र सुरू केलं आहे. ईडीच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडत आहेत. गुरुवारी (४ जानेवारी) रात्री ईडीने हरिणायातील यमुनानगर, फरीदाबाद, सोनीपत, मोहालीसह चंदीगढमध्ये अचानक छापेमारी केली. यावेळी एका माजी आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नोटांचा साठा इतका होता, की पैसे मोजताना मशीन देखील बंद पडले. रात्री १२ वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी (ED) नोटा मोजत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकांनी यमुनानगरचे माजी आमदार दिलबाग सिंग यांचे घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी गुरुवारी एकाच वेळी छापेमारी केली.

यावेळी ईडीच्या पथकाला दिलबाग सिंह यांच्या घरात ५ कोटी रुपयांच्या चलनी नोटा सापडल्या. याशिवाय विदेशी शस्त्रे आणि ३०० जिवंत काडतुसेही देखील आढळून आले. ही शस्त्रे विदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त केली.

नोटा मोजताना अचानक मशीन बंद पडल्यामुळे ईडीचे अधिकारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पैसे मोजत होते. अवैध उत्खनन प्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केल्याची माहिती आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा खाण उत्खननाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीची ही मोठी कारवाई आहे.

ईडीच्या अधिकार्‍यांनी देश-विदेशातील अनेक चल-अचल संपत्तीशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. दरम्यान ईडीच्या अचानक छापेमारीमुळे परिसरातील खाण व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सध्या ईडीचे पथक खाणकामाशी संबंधित कागदपत्रांचीही छाननी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT