US Firing: अमेरिकेतील शाळेत गोळीबार; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

Firing in school : गुरुवारी पहाटे एका हल्लेखोराने पेरी हायस्कूलवर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एकाचा मृत्यूही झालाय. सकाळी शाळेत गोळीबारीची घटना घडली त्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली.
US Firing:
US Firing:AP News
Published On

Firing in school at Iowa America:

अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. ही घटना आयोवामधील पेरीच्या हायस्कूलमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. हिवाळी सुट्टीनंतर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Latest News)

मात्र अद्याप जखमींच्या संख्येची पुष्टी झालेली नाही. तसेच पोलिसांकडूनही जखमी आणि जीवितहानी विषयी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीये.व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन या घटनेवर सतत लक्ष ठेवून आहेत. बायडन वरिष्ठ अधिकारी आयोवा गव्हर्नर कार्यालयाच्या सतत संपर्कात आहेत. दरम्यान तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोळीबारी झालेल्या शहराचे नाव पेरी असून ते आयोवा राज्यातील डल्लास काउंटीमधील आहे. पेरी हे शहर उत्तर रॅकून नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे एका हल्लेखोराने पेरी हायस्कूलवर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एकाचा मृत्यूही झालाय. सकाळी शाळेत गोळीबारीची घटना घडली त्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. दरम्यान हा गोळीबार कोणी केला या घटनेची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु ज्या शाळेत हा गोळीबार झाला त्या शाळेत १७८५ विद्यार्थी शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

US Firing:
Qatar Dahra Global Case: कतारमधील 8 माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com