hariyana Singer Sangeeta Murder
hariyana Singer Sangeeta Murder Saam Tv
देश विदेश

भयंकर! शुटिंगच्या बहाण्याने प्रसिद्ध गायिकेला अज्ञातस्थळी बोलावलं; त्यानंतर...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : तब्बल 12 दिवसांपासून बेपत्ता असलेली हरियाणाची गायिका संगीता काल मृतावस्थेत आढळून आली. सोमवारी (24 मे) संगीताचा मृतदेह रोहतक जिल्ह्यातील एका महामार्गालगत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. संगीताच्या कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा आणि हत्येचा आरोप तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांवर लावला होता. दरम्यान, आता पोलिसांनी या दोनही तरुणांना अटक करून त्यांची चौकशी केली असता, आपणच संगीताचा खून केला असल्याची कबूली त्यांनी दिली.

दिल्लीत वास्तव्यास असलेल्या संगीताला तिच्या कुटुंबीयांनी 11 मे रोजी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांवर संगीताचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप संगीताच्या कुटुंबीयांनी केला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हरियाणातील मेहम येथून दोन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, या दोन तरुणांची कसून चौकशी केली असता त्यांनी संगीता उर्फ ​​दिव्याचे अपहरण करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. दोघांपैकी एकाने संगीताला गाण्याचा अल्बम शूट करण्याचे आमिष दाखवून मेहम परिसरात आणले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिची हत्या केली. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह मेहम पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

दरम्यान, आरोपीच्या कबुलीवरून आता पोलिसांनी संगीताच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या संगीताचा मृतदेह पीजीआय रोहतक येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

SCROLL FOR NEXT