संतापजनक! 5 वर्षीय चिमुकलीसोबत शाळेतील शिपायाचं घृणास्पद कृत्य

हेमंत वैती (वय ५२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Tv

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) मुलुंड येथील नामंकित शाळेत 5 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर शाळेतील शिपायानेच गैरकृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अल्पवयीन चिमुकलीला शाळेतीलच एका खोलीत नेत हे गैरकृत्य केल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Mumbai Crime News)

Mumbai Crime
औरंगाबाद महाविद्यालयीन तरुणी हत्या प्रकरण; आरोपीला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी

हेमंत वैती (वय ५२) असं अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. शाळा सुरू असताना आरोपीने अल्पवयीन चिमुकलीला शाळेतीलच एका खोलीत नेलं. आणि तिथे तिच्यासोबत गैरकृत केलं. ही संतापजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी हेमंती याला अटक केली आहे.

सध्या अल्पवयीन मुलीला वैदयकीय उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com