Hargun Kaur Matharu ranks first in india saam tv
देश विदेश

ICSE EXAM RESULT : नावातच आहे 'गुण', हरगुण कौर माथरू देशात पहिली, ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

आयसीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत (ICSE SSC Exam Result) तीन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने ९९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पुण्यातील सेंट मेरी शाळेतील हरगुण कौर माथरू (Hargun Kaur Matharu) या विद्यार्थीनीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएससीईतर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला. देशातील दोन हजार ५३५ शाळांमधील दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात एक लाख २५ हजार ६७८ विद्यार्थी,तर एक लाख पाच हजार ३८५ विद्यार्थिनींचा समावेश होता.

या निकालातही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थिंनीपैकी ९९.९८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९७ टक्के इतकी आहे.आयसीएसईची लेखी परीक्षा ६१ विषयांमध्ये आणि देशातील २० भाषा,९ परदेशी भाषा आणि एक क्लासिकल भाषेत झाली. देशात दक्षिण आणि पश्चिम विभागातील ९९.९९ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT