शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढणार सांगा; नितीन गडकरींचा पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरनंतर पुन्हा अमरावतीत कृषी विद्यापीठावर निशाणा साधला.
Nitin Gadkari Latest News
Nitin Gadkari Latest NewsSaam Tv

अमर घटारे

अमरावती: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरनंतर पुन्हा अमरावतीत कृषी विद्यापीठावर निशाणा साधला. सोयाबीन झाले पाहिजे असं मला वाटत होते, पण मला एकरी ५ क्विंटलच्यावर सोयाबीन काही झाले नाही. तुम्ही हे करत असाल तर सांगा नाही तर तुमचा उपयोग काय असा थेट सवालचं नितीन गडकरी त्यांनी उपस्थित करत कृषी विद्यापीठावर प्रश्न उपस्थित केला. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर शेतकऱ्यांच उत्पादन कसे वाढणार हे आम्हाला सांगा असे आव्हान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कृषी विद्यापीठाला यावेळी दिले.

Nitin Gadkari Latest News
शिंदे-फडणवीस स्थगिती सरकार; आमदार अमोल मिटकरींची टीका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज अमरावती दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि ऍग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडे वळण सध्या गरजेचे आहे. यासोबत विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे गरजेचे असून यातून एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे. तरच यशस्वी शेतकरी बनू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन केले.

यासोबतच एकरी १०२ टन ऊस उत्पादन घेणारे शेतकऱ्यांचे देखील त्यांनी कौतुक केले. शेती करताना उत्पादन खर्च कमी, आणि व्हॅल्यूएडिशन करणे त्यासोबतच उत्तम पॅकेजिंग करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रविवाहात मार्गदर्शन घेऊनच शेती केल्यास शेती उत्तम ठरू शकते. विविध प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. यातून चांगले उत्पादन देखील होऊ शकते. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही असे वक्तव्य देखील गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

Nitin Gadkari Latest News
'लोकांचा नाथ एकनाथ', स्वखर्चातून विशेष विमानाने रुग्णांना बिहारमधून पुण्यात आणलं, त्यानंतर...

मराठवाड्यासारखी फळे, भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आणि मेहनतीची गरज आहे, असे झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही. आणि भारत देश शेतीच्या प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com