Gyanvapi Masjid Case
Gyanvapi Masjid Case Saam Tv
देश विदेश

Gyanvapi Masjid Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी वाराणसी कोर्टात ४५ मिनिटे सुनावणी; निर्णय ठेवला राखून

Nandkumar Joshi

वाराणसी: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid Case) प्रकरणी आज, सोमवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने आपला निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. आज न्यायालयात जवळपास ४५ मिनिटे सुनावणी झाली. दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने (varanasi district court) आपला निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. आता या प्रकरणी उद्या सुनावणी झाल्यानंतर न्यायालय निर्णय देऊ शकते. आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली होती. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणात सुनावणीसंबंधी जिल्हा न्यायाधीशांना दिलेल्या आदेशात म्हटलं होतं की, न्यायालयात केवळ या प्रकरणाशी संबंधित वकील उपस्थित राहतील. त्यामुळे आज सुनावणीवेळी वादी आणि प्रतिवादी पक्षाचे एकूण २३ जण उपस्थित होते. (gyanvapi masjid case Hearing)

ज्ञानवापी मशीद प्रकरणात आजपासून वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे. उद्याही न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून उद्या या प्रकरणात निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाने यावरील आपला निर्णय उद्यापर्यंत सुरक्षित ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुनावणीवेळी न्यायालय हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांची मते जाणून घेणार आहे. या प्रकरणात एकूण तीन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात दोन्ही पक्षकारांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

आठ आठवड्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणात सुनावणी घेतानाच, जिल्हा न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी होईल असे आदेश दिले. तसेच आठ आठवड्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिले. दरम्यान, आज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेस यांनी निर्देश दिले होते. सुनावणीवेळी कोर्टरूममध्ये केवळ या प्रकरणाशी संबंधित वकील उपस्थित राहतील, असे त्यांनी आदेशात म्हटले होते. दुसरीकडे, आजपासून सुनावणी सुरू होणार असल्याने कोर्टाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Govinda Maval Lok Sabha News | गोविंदा नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

Today's Marathi News Live : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकरांचा नवा जाहीरनामा

D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT