Old Victoria Era Coins Google
देश विदेश

Madhya Pradesh News: घराचा पाया खोदताना सापडला ब्रिटिशकालीन खजिना, घरमालक राहिला बाजूला कामगारांमध्येच झाली तुंबळ हाणामारी

Old Victoria Era Coins: घराचं बांधकाम करताना एका व्यक्तीला मोठा खजिना सापडला आहे. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

Rohini Gudaghe

Silver Coins Found In Digging Of Land

जमिनीमध्ये पूर्वजांनी खजाना गाडून ठेवला आहे, असं आपण अनेकदा मस्करीमध्ये म्हणतो. पण जर हे खरं असेल तर? खरंच तुम्हाला असा खजिना सापडला तर, असा कधी विचार केला आहे. मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे. घराचं बांधकाम करत असताना एका व्यक्तीला मोठा खजिना सापडला आहे.  (latest accident news)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) येथे एका उत्खननात ब्रिटिशकालीन दुर्मिळ नाणी सापडली. ही बातमी पसरताच नागरिकांची गर्दी झाली. या नाण्यांवरून कामगारांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळतेय. परिस्थिती अगदी हाणामारीपर्यंत पोहोचली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. कामगारांना शांत करीत त्यांनी उत्खननात सापडलेली नाणी जप्त केली. ही नाणी (Victoria Era Coins) चांदीची आहेत. ते सुमारे दीडशे वर्षे जुने असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाया खोदताना खजाना सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश सिंह बघेल नावाच्या व्यक्तीने इंदरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खल्लासीपुरा परिसरात एक प्लॉट खरेदी केला होता. या जमिनीवर घर बांधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी पाया खोदण्यात येत होता. मजूर खोदण्याचं काम करत होते. तेव्हा एका कामगाराला चांदीची नाणी जमिनीत गाडलेली दिसली. त्याने ही चांदीची नाणी (Silver Coins) जमिनीतून काढली. नाण्यांच्या वाटपावरून कामगारांमध्ये वाद झाला, हा वाद मिटवण्यासाठी तेथे काही लोक पोहोचले होते.

शेजाऱ्याने काही कामगारांना पकडलं. तेव्हा कामगार नाणी घेऊन पळू लागले. इंदरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी घटनास्थळावरून काही मजुरांना पकडलं (Madhya Pradesh News) आहे. याशिवाय जवळच छापा टाकून काही लोकांना पकडले. सर्वांची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पुरातत्व विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे.

नाण्यांवर राणी व्हिक्टोरियाची सही

जमीनमालक हरीश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीतून सुमारे 35 ते 40 नाणी सापडली आहेत. ही नाणी घेऊन कामगार घटनास्थळावरून पळून गेले (Old Victoria Era Coins) होते, मात्र त्यावेळी जमीनमालक तेथे उपस्थित नव्हते. पोलिसांनी आतापर्यंत केवळ 7 नाणी जप्त केली आहेत.

पोलिसांनी जप्त केलेली नाणी सुमारे 150 वर्षे जुनी आणि वेगवेगळ्या वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही नाणी 1885 सालातील असल्याचं सांगितले जातं आहे. या नाण्यांवर राणी व्हिक्टोरियाची सही असल्याचं दिसतंय. सध्या ही ऐतिहासिक चांदीची नाणी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT