Guwahati Woman Anchor Found Death Saam Tv
देश विदेश

Shocking: महिला न्यूज अँकरची ऑफिसमध्येच आत्महत्या, १० दिवसांवर होतं लग्न; त्याआधीच आयुष्य संपवलं

Guwahati Woman Anchor Found Death: एका महिला न्यूज अँकरने ऑफिसमध्ये आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. १० दिवसांनी तिचे लग्न होणार होते.

Priya More

Summary -

  • गुवाहाटीतील एका महिला न्यूज अँकरने ऑफिसमध्ये आत्महत्या केली

  • ऑफिसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

  • सकाळी ऑफिसमध्ये इतर कर्मचारी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली

  • रितुमोनी रॉय असं या महिला अँकरचे नाव होते

गुवाहाटीमध्ये एका महिला न्यूज अँकरने ऑफिसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. गुवाहाटीच्या एका स्थानिक न्यूज पोर्टलमध्ये काम करणाऱ्या न्यूज अँकरने ऑफिसमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. सोमवारी सकाळी ऑफिस उघडल्यानंतर या न्यूज अँकरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून सर्वजण घाबरले. पुढच्या महिन्यामध्येच तिचे लग्न होणार होते. घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होती. अशातच न्यूज अँकरने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, रितुमोनी रॉय असे या महिला अँकरचे नाव होते. ती काम करत असलेल्या न्यूज पोर्टलचे ऑफिस गुवाहाटीतील ख्रिश्चन बस्ती परिसरात आहे. रितुमोनी त्याच ऑफिसमध्ये मृतावस्थेत आढळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती टेबलावर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुवाहाटी पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोटही सापडली. यामध्ये तिने फक्त असे लिहिले होते की, 'हे सर्वांच्या कल्याणासाठी आहे. मला माफ करा.' त्यात जास्त काही लिहिले नव्हते. सुरुवातीच्या अहवालांनुसार, रितुमोनी २३ नोव्हेंबर रोजी ऑफिसला गेली होती पण त्या रात्री घरी परत आली नाही. सोमवारी सकाळी तिचे सहकारी ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना रितुमोनीचा मृतदेह दिसला ते पाहून त्या सर्वांना धक्का बसला.

रितुमोनी यांनी यापूर्वी अनेक डिजिटल मीडिया संस्थांसाठी काम केले होते. रितुमोनीचे पुढील महिन्याच्या ५ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. लग्नपत्रिका आधीच वाटण्यात आल्या होत्या. घटनेच्या आदल्या रात्री ती एका मैत्रिणीच्या घरी लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर ती ऑफिसमध्ये आली आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. असेही म्हटले जात आहे की, रितुमोनीच्या आत्महत्येमागील कारण आर्थिक असू शकते. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर लीक? बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसनं पोस्ट शेअर करून दिली माहिती

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहाचा हटके लूक; PHOTO पाहा

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

SCROLL FOR NEXT