9 Year Girl Killed By 16 Year Old Boy In Haryana Saam tv
देश विदेश

Gurugram Crime: आधी गळा दाबला, मग कापूर टाकून जाळले, १६ वर्षीय विद्यार्थ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य

9 Year Girl Killed By 16 Year Old Boy In Haryana: हरियाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर 107 मध्ये ही घटना घडली. ग्लोबल सिग्नेचर सोसायटीमध्ये हे दोघेही राहत होते. चोरी करताना मुलीने आरोपीला पाहिले होते. त्यामुळे त्याने तिची हत्या केली.

Priya More

गुरूग्राममध्ये (Gurugam) धक्कादायक घटना घडली आहे. ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलानेच या मुलीची हत्या केली. हरियाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर 107 मध्ये ही घटना घडली. ग्लोबल सिग्नेचर सोसायटीमध्ये हे दोघेही राहत होते. दोघांच्याही कुटुंबीयांचे एकमेकांशी चांगले संबंध होत. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी (Gurugram Police) मुलाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे गुरूग्राम हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गुरूग्राममध्ये एका १६ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाने मुलीचा मृतदेह कापूर आणि कपडे टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी मुलाला मुलीने तिच्या घरातून दागिने चोरताना रंगेहात पकडले होते. आपली चोरी पकडली गेल्यामुळे या मुलाने टोकाचे पाऊल उचलत ९ वर्षांच्या मुलीचीच हत्या केली. हत्या झालेली मुलगी आणि आरोपी दोघांचे कुटुंबीय गुरुग्राममधील सेक्टर 107 मधील सिग्नेचर ग्लोबल सोलेराच्या दोन वेगवेगळ्या टॉवरमध्ये राहतात आणि त्यांच्यात चांगले संबंध होते. ही घटना घडली तेव्हा मुलीची आई आरोपी मुलाच्या घरी होती. तर तिचे वडील ऑफिसला गेले होते.

पोलिसांनी सांगितले की, १६ वर्षांचा मुलगा हत्या झालेल्या मुलीच्या दोन वर्षांच्या भावासोबत नेहमी खेळायचा. सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मुलीच्या भावाला घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. तिच्या भावाला घेऊन तो आपल्या घरी गेला. काही वेळाने मुलीची आई आपल्या मुलाला घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी मुलाने काही तरी बहाणा करून मुलीला घरकामात मदत करतो असे सांगून तिच्या घरी गेला. साडेनऊ वाजता मुलीने आपल्या आईला फोन केला की दूधवाला आला आहे. त्यानंतर मुलीची आई १० वाजता घरी पोहोचली असता तिला घराचा लोखंडी दरवाजा बंद असल्याचा दिसला. घरामध्ये मुलाला पाहून महिलेने त्याला दरवाजा खोलायला सांगितले पण त्याने दुर्लक्ष केले.

यानंतर मुलीच्या आईने अलार्म लावला. शेजारी राहणाऱ्यांना आणि सोसायटीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना बोलावले. १० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाने बाल्कनीतून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता मुलगी बेडवर जळालेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी आरोपीने मुलीच्या घरातून चोरी केली तेव्हा मुलीची आई आरोपीच्या घरी होती. मुलगी चौथीत शिकत होती. आरोपी दहावीचा विद्यार्थी आहे. आरोपीने आधी दोन चोरट्यांनी घरात घुसून मुलीची हत्या केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर आरोपीने मुलीच्या हत्येची कबुली दिली. गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने 20 हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दागिने चोरल्याचे सांगितले. याप्रकरणी राजेंद्र पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT