Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Medha Patkar Punishment By Delhi Court: २००१ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात कोर्टाने मेधा पाटकर यांना २४ मे २०२४ रोजीच दोषी ठरवले होते. सोमवारी याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Medha PatkarSaam Tv
Published On

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना कोर्टाने ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत त्यांना १० लाखांचा दंड ठोठावला आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दिल्लीच्या साकेत कोर्टाने (Delhi Saket Court) त्यांना ही शिक्षा सुनावणी आहे. मेधा पाटकर यांना मानहानीच्या प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले आणि त्यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Rahul Gandhi Speech: हिंदू, हिंसा, द्वेष... राहुल गांधींच्या ९० मिनिटांच्या भाषणातून मोठे मुद्दे गायब; सभापतींनी चालवली कात्री!

२००१ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात कोर्टाने मेधा पाटकर यांना २४ मे २०२४ रोजीच दोषी ठरवले होते. सोमवारी याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. मेधा पाटकर यांना १० लाखांचा दंड ठोठावत हे पैसे विनय सक्सेना यांना बदनामीची भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले आहे. मेधा पाटकर यांच्यावर लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्याविरोधात प्रेस रिलीज करून लोकांमध्ये त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. सक्सेना यांची दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यावर मेधा पाटकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Narendra Modi News : चहा विकणारा तीनदा पंतप्रधान झालाय म्हणून काँग्रेसवाले गोंधळून गेलेत : नरेंद्र मोदी

कोर्टाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, तक्रारदार विनय कुमार सक्सेना हे भ्याड, देशद्रोही आणि हवाला व्यवहारात गुंतलेले असल्याचा आरोप करणाऱ्या मेधा पाटकर यांचे वक्तव्य फक्त अपमानास्पद नव्हते तर ते नकारात्मक अर्थांना भडकावण्यासाठी तयार करण्यात आले होते. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मेधा पाटकर यांचे वय, आरोग्य आणि कालावधी लक्षात घेता फारशी शिक्षा दिली जात नाही. या गुन्ह्यासाठी कमाल २ वर्षे साधी कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती. मात्र, पाटकर यांना या आदेशाविरुद्ध अपील करता यावे म्हणून कोर्टाने या शिक्षेला महिनाभरासाठी स्थगिती दिली.

Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत तगडी फाईट होणार; उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, महायुतीची धाकधूक वाढली

कोर्टाच्या निर्णयानंतर मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही. आम्ही कोणाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही फक्त काम करतो. या निर्णयाला आम्ही हायकोर्टात आव्हान देणार आहोत. मेधा पाटकर या 'नर्मदा बचाव आंदोलना'शी जोडल्या गेल्या आहेत. कोर्टाने ७ जून रोजी झालेल्या सुनावणीत मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते आणि शिक्षेसाठी १ जुलैची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार सोमवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.

Medha Patkar: मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगावास आणि १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Ambadas Danve News : आंदोलन करा किंवा कोर्टात जा, अंबादास दानवे वक्तव्यावर ठाम; सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com