Alirajpur Case: तीच तारीख आणि तीच पद्धत...6 वर्षांनी पुन्हा बुराडीसारखी घटना; घरात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळले

Delhi burari Case like in alirajpur: मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये दिल्लीतील बुराडीसारखी घटना घडली आहे. अलीराजपूरमध्ये घरात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळले आहेत.
तीच तारीख आणि तीच पद्धत...6 वर्षांनी पुन्हा बुराडीसारखी घटना; घरात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळले
Pune PoliceSaam Digital
Published On

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या अलीराजपूर येथे एकाच घरातून पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अलीराजपूरमधील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ही घटना हत्या आहे की आत्महत्या? याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या घटनेबाबत या मृतदेहांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर ही माहिती समोर येणार आहे. आजच्या दिवशीच म्हणजे १ जुलै २०१८ रोजी दिल्लीच्या बुराडीमध्ये याच प्रकारची घटना घडली होती.

तीच तारीख आणि तीच पद्धत...6 वर्षांनी पुन्हा बुराडीसारखी घटना; घरात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळले
Solapur Crime News : सोलापुरात मध्यरात्री तरुणासोबत घडलं भयकर कांड, अज्ञाताने डोक्यात दगड घालून केली हत्या

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा ठाणे येथील रावडी गावातील ही घटना आहे. या घटनेत घरातील प्रमुख व्यक्ती राकेश, पत्नी ललीता, मुलगी लक्ष्मी, दोन मुले अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. नातेवाईकांनी या पाच जणांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला आहे.

काय आहे दिल्लीतील बुराडी प्रकरण?

दरम्यान, दिल्लीतील बुराडी प्रकरणाने संपूर्ण देश हळहळला होता. १ जुलै रोजी झालेल्या घटनेला ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. ३० जून २०१८ रोजी एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

तीच तारीख आणि तीच पद्धत...6 वर्षांनी पुन्हा बुराडीसारखी घटना; घरात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळले
Chandrapur Crime News : आनंदवनात युवतीची हत्या, सेवाग्रामहून परतल्यानंतर पालकांना बसला माेठा धक्का

या कुटुंबातील १० जणांना फासावर लटकवण्यात आलं होतं. तर कुटुंबातील वयोवृद्ध महिलेची हत्या केली होती. त्यानंतर सकाळी या सर्व लोकांचे मृतदेह घरातून ताब्यात घेण्यात आले होते. बुराडी केसमध्ये कुटुंबातील प्रमुक ललित भाटियाने वशीकरण करत कुटुंबातील सर्व व्यक्तींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असा दावा या केसमध्ये करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील ११ जणांच्या आत्महत्येने गावकऱ्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com