crime News Saam Tv
देश विदेश

बर्थडे पार्टी, दारू अन् बलात्कार... १९ वर्षांच्या मुलीवर मित्राचा जबरदस्ती अत्याचार, नशेत केलं काळ कांड

Gurugram Crime News : गुरुग्राममध्ये बर्थडे पार्टीनंतर १९ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

बर्थडे पार्टीनंतर मित्राने १९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीजवळच्या गुरूग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरूणी ही मूळची बंगालचे असल्याचे समजतेय. वाढदिवसासाठी सर्व मित्र मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते. बर्थडे पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू पिण्यात आली. दारूच्या नशेतच एका मुलाने मैत्रिणीवरच बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे.

वाढदिवसाची पार्टी सुरू होती. सर्वजण दारूच्या नशेत होते. त्यावेळी एका मुलाने काहीतरी बहाणा करून त्या मुलीला निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर नशेत असताना तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. आरोपीच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यानंतर सर्वांनी तिकडे धाव घेतली. पण कुणाला काही समजण्याआधी तरूणाने तिथून पळ काढला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

राजधानी दिल्लीच्या जवळ असणाऱ्या गुरुग्राममधील सेक्टर-३३ मधील एका सोसायटीमध्ये हे काळं कांड घडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १९ वर्षांची असून मूळची पश्चिम बंगालची आहे. पीडित मुलगी दिल्ली विद्यापीठात शिकते. शनिवारी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. ती मुलगीही फ्लॅटवर गेली होती. तिथे उपस्थित असलेले सर्वजण दारूच्या नशेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिव्यम यालाही या बर्थडे पार्टीचे आमंत्रण मिळाले होते. रात्री उशिरापर्यंत प्लॅटवर पार्टी सुरू होती. त्यावेळी त्या तरुणाने पीडितेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. तिला फ्लॅटमधील एका निर्जन ठिकाणी नेले. तिच्या नशेत असण्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने घटनेनंतर लगेचच आपल्या एका मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गोंधळ झाल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेने दुसऱ्या दिवशी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे धाडस केले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 64(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि संबंधित न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अजून एका महिलेला घेतलं ताब्यात

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, ३० मेपासून उपोषणाला बसणार; सरकारकडे केल्या १३ प्रमुख मागण्या

Maharashtra Election: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी, कुठे अन् कधी पार पडणार मतदान? निवडणूक कार्यक्रम जाहीर

Earthquake Video : भूकंपाने जमीन थरथरली; १३ इमारती कोसळल्या, थरारक व्हिडिओ

Hair Care: डोक्यावर पडत चाललेलं टक्कल कमी करुन लांब सिल्की केस हवेत? मग आठवड्यातून १ वेळा लावा हा हेअर मास्क

SCROLL FOR NEXT