Gunfire at BJP Supporters House Saam Tv
देश विदेश

नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ; भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, त्या रात्री नेमकं काय घडलं?

Shots Fired at BJP Supporter: गयाजी जिल्ह्यातील भाजप समर्थकाच्या घरावर गोळीबार. बिहार बंददरम्यान झालेल्या वादातून घटना घडली. घराची काच फुटली, मात्र कोणालाही इजा झाली नाही.

Bhagyashree Kamble

  • गयाजी जिल्ह्यातील भाजप समर्थकाच्या घरावर गोळीबार.

  • बिहार बंददरम्यान झालेल्या वादातून घटना घडली.

  • घराची काच फुटली, मात्र कोणालाही इजा झाली नाही.

  • पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला.

बिहारमधील गयाजी जिल्ह्याती फतेहपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या समर्थकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. गुरूवारी बिहार बंद दरम्यान बाचाबाची झाली. या मुद्द्यावरून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गया - राजौली राज्य महामार्ग - ७० वर असलेल्या पोवा येथे घडली. गोळी लागल्याने घराची काच फुटली. सुदैवानं कुणीही जखमी झाले नाही.

ही धक्कादायक घटना गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. भूषण यांचे पुत्र मुकेश कुमार यांनी सांगितले की, बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर पोवा येथे एनडीए कार्यकर्त्यांनी रस्ता रोखला होता. त्याचवेळी ढिबर गावातील राजा यादव या तरूणानं येऊन शिवीगाळ आणि गैरवर्तन करण्यास सुरूवात केली. तसेच रस्ता रोखला.

यावरून वाद निर्माण झाला होता. राजा यादव या तरूणानं येऊन भाजप समर्थकाच्या घरावर धाडधाड गोळ्या झाडल्या. पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रशांत कुमार सिंह म्हणाले की, माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईवरून शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ एनडीएने गुरूवारी बिहार बंदची हाक दिली होती. यादरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तसेच निषेध नोंदवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

SCROLL FOR NEXT