Surat Crime News Saam tv
देश विदेश

Surat News: एकाला वाचवायला गेले अन् जीव गमावून बसले; सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन ४ मजूरांचा मृत्यू

Surat News: कारखान्यात असलेल्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे

Gangappa Pujari

Labours Died In Septic Tank:

गुजरातमधून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सुरतमध्ये सेप्टिक टँकमध्ये काम करताना गुदमरून चार स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. पलसाणा-काटोदरा रोडवर असलेल्या एका गारमेंट डाईंग कारखान्यात ही घटना घडली. कारखान्यात असलेल्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी उशिरा सूरतच्या पलसाना येथील कारखान्यात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरल्यामुळे दोन प्रवासी मजूर बेशुद्ध पडले. दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन मजूरही टाकीत उतरले, मात्र त्यांचीही प्रकृती बिघडू लागली आणि तेही बेशुद्ध पडले.

घटनेनंतर सर्वांना तातडीने टाकीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषीत केले. हे चारही मृत तरुण बिहारचे (Bihar) रहिवासी आहेत. आम्ही कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करत आहोत आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच "आम्हाला बुधवारी सकाळी साडेसहा वाजता याबाबत माहिती मिळाली. जेव्हा आमचं पथक घटनास्थळी दाखल तेव्हा गुदमरुन मृत्यू पावलेले ४ मृतदेह आढळले. हे चारही मजूर फॅक्टरी शेजारीच वास्तव्यास होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT