Gujarat: द्वारकेतून 350 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पाकिस्तानमधून तस्करी
Gujarat: द्वारकेतून 350 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पाकिस्तानमधून तस्करी Saam Tv
देश विदेश

Gujarat: द्वारकेतून 350 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पाकिस्तानमधून तस्करी

वृत्तसंस्था

गुजरात : अंमली पदार्थ प्रकरणावरुन गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण गाजतं आहे. महाराष्ट्रामध्ये Maharashtra ड्रग्जवरुन आरोप प्रत्यारोपची मालिका सुरु असताना सुरु असतानाच आता गुजरातमध्ये Gujarat दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ज्यात हेरॉईन आणि एमडी या अंमली पदार्थाचा समावेश आहे. यापूर्वीही कारवाई करत गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. करण्यात आलं होतं.

हे देखील पहा-

पाकिस्तानमधून तस्करी, तीन जणांना अटक -
धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून Pakistan तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुजरात पोलिसांनी Gujarat Police अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

३५० कोटींचं ड्रग्ज -
गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. हेरॉईनसोबत ६६ किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये असल्याचं समजत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्जची तस्करी पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे होत होती. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ड्रग्ज जप्त केलं.

सापळा रचून अटक -
स्थानिक गुन्हे शाखेला Crime Branch एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार आहे अशी माहहती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि वांकानेर रस्त्यावर सापळा रचत तस्करांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार, एका बॅगमध्ये १५ किलो ड्रग्स होते तर, दुसऱ्या बॅगमध्ये ४५ किलो ड्रग्ज होतं.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

SCROLL FOR NEXT