Maval Lok Sabha Constituency:
मावळ लोकसभेची निवडणूक जिकंण्यासाठी महायुतीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. येथून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मैदानात आहेत. बारणे हे येथून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता तिसऱ्यांदा ते आखाड्यात उतरले आहेत.
शिवसेना फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपल्यासोबत आलेले खासदार पुन्हा निवडून आणण्याचे आव्हान आहे.
अशातच शिंदे गटासाठी चांगली गोष्ट म्हणजे मावळ लोकसभा मतदारांघात येणारे सहाही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बारणेंसोबत आहेत. त्यामुळे याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळू शकतो, असं बोललं जात आहे.
बारणे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळावा यासाठी स्व. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरराव जगताप हे देखील मैदानात उतरले आहेत. बारणे यांच्यासाठी शंकर जगताप हे येथे 100 नमो संवाद सभा घेणार असून त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. बारणे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी शंकर जगताप यांनी हा प्लॅन तयार केला आहे. चिंचवड शहरात असणाऱ्या सर्व उपनगरांतील सर्व सोसायट्यांमध्ये शंकर जगताप हे स्वतः जाऊन संवाद साधत आहेत. याचा लाभ बारणे यांना मिळू शकतो.
दरम्यान, सुधाकर घारे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात केले होते. कर्जत शहरातील रॉयल गार्डन येथे हा कार्यक्रम संप्पन्न झाला. यावेळी सुधाकर घारेंच्या नेतृत्त्वात पक्षात महिला संघटन मोठ्या ताकदीने सक्रिय असल्याचं पहायला मिळालं. कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.