KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Congress Leader KPK Jeyakumar : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृतदेह आज तिरुनेलवेली येथे अर्धा जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
KPK Jeyakumar
KPK JeyakumarSaam Digital

गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृतदेह आज तिरुनेलवेली येथे अर्धा जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये त्यांच्या मृतदेह आढळला असून पोलिसांनी तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केपीके जयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मृतदेहाजवळ केपीके जयकुमार यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून प्रथमदर्शनी ते त्यांनी लिहिलेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांचा मृत्यूच्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे. एआयएडीएमके प्रमुख इपीएस यांनी, ही घटना म्हणजे ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणता जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

KPK Jeyakumar
Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमकेसोबत युती केली होती. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या निधनाने या आघाडीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांवर मतदान झालं.

KPK Jeyakumar
Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com